ॲग्रोवन वृत्तसेवा
Onion Export : नाशिक : भारताचा प्रमुख कांदा आयातदार असलेल्या बांगलादेशमध्ये बकरीच्या पार्श्वभूमीवर आयातीचे कामकाज जवळपास आठवडाभर बंद होते. तेथील सुट्या संपल्यानंतर मंगळवार (ता.४) पासून भारतातून निर्यात कामकाज पुन्हा एकदा सुरू झाले आहे. सध्या बांगलादेशात कांद्याला मागणी (Onion Export) आहे. याशिवाय हिरव्या मिरचीच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर मागणी वाढली आहे. त्यामुळे निर्यात सुरू झाल्याचा फायदा शेतीमाल दरासाठी होईल.
सध्या उन्हाळ कांद्याच्या साठवणूकपश्चात टिकवणक्षमतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे चाळीमध्ये कांदा सडू लागला आहे. मात्र मध्यप्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रातील कांदा सडण्याचे प्रमाण कमी आहे. याशिवाय गुणवत्तेचा कांदा महाराष्ट्रातून उपलब्ध होऊ लागल्याने बांगलादेशमधील कांदा आयातदारांनी या कांद्यालाच पसंती दिली आहे.
बांगलादेशमध्ये स्थानिक बाजारपेठेत हिरव्या मिरचीची आवक घटल्याने प्रतिकिलो ३०० ते ४०० टका असे मिरचीचे दर गेले आहेत. त्यामुळे बांगलादेश सरकारकडून तातडीने ३ हजार टन हिरव्या मिरचीच्या आयातीसाठी ७ आयातदारांना परमीट जारी केले असल्याची माहिती मिळाली.
बकरी ईदनंतर पुन्हा निर्यात कामकाज सुरू झाले आहे. कांद्याला एक हजारांपासून ते दोन हजारापर्यंत प्रतिक्विंटल दर मिळत आहेत. तर बांगलादेशमध्ये निर्यात केलेल्या कांद्याला ३० ते ४० रुपये किलो दर आहे. राज्यातील कांद्याची प्रतवारी व गुणवत्ता चांगली असल्याने मागणी टिकून आहे.
- खंडूकाका देवरे, अध्यक्ष, नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशन.
बांगलादेशची आयात पुन्हा सुरू झाल्याने कांदा पिकासाठी त्याचा फायदा होत आहे. कांद्याला प्रतिकिलो ६ ते ६.५ रुपये वाहतूक खर्च निर्यातीसाठी येतो. रस्त्याने वाहतूक परवडणारी नाही. त्यामुळे सरकारने पुन्हा किसान रेल्वे उपलब्ध करून दिल्यास निर्यातीला चालना मिळेल.
- मनोज जैन, शेतीमाल निर्यातदार, लासलगाव, जि. नाशिक.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.