Devendra Fadnavis on Union Budget 2023 Agrowon
ताज्या बातम्या

Union Budget 2023 : नैसर्गिक शेतीसाठी मोठी गुंतवणूक : फडणवीस

डिजिटल आणि तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करण्याच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात विचार केला आहे. सहकार क्षेत्राला महत्त्व दिले आहे.

Team Agrowon

Union Budget 2023 : "या अर्थसंकल्पात (Union Budget 2023) गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी (Farmer) आणि युवा वर्गाचा विचार आहे. पुढील २५ वर्षांच्या विकसित भारताचे प्रतिबिंब आहे. शेतीक्षेत्रात मोठी गुंतवणूक होत असून नैसर्गिक शेतीवरील (Natural Agricultural) भर महत्त्वाचा आहे." अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.

एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळविणे म्हणजे नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शेतीचा नाश रोखण्यासाठी टाकलेले पाऊल आहे. जलवायुपरिवर्तनावरील प्रभाव थांबविण्याचा प्रयत्न आहे. या अर्थसंकल्पात सबसिडीपलीकडील विचार केला आहे.

डिजिटल आणि तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करण्याच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात विचार केला आहे. सहकार क्षेत्राला महत्त्व दिले आहे. विकास संस्थांना मल्टिपर्पज सोसायट्यांचा दर्जा मिळत आहे. गावपातळीवर आता सहकार मजबूत होईल.

२० प्रकारच्या योजनांमध्ये प्राथमिकता मिळेल. विकास संस्था कोल्ड स्टोरेजपासून पेट्रोल पंपांपर्यंतचे व्यवसाय करू शकतील. साखर कारखान्यांचा १० हजार कोटींचा प्राप्तिकर भरावा लागणार नाही. त्यामुळे साखर उद्योगाला बूस्ट मिळत आहे.

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Oil Market: सणांमुळे खाद्यतेलाची आयात वाढणार; सोयातेलाची आयात विक्रमी पातळीवर 

Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं दिवाळीनंतर वाजणार बिगुल

Farm Road Model : शेतरस्त्याचा औसा पॅटर्न आता राज्यभरात

Sindhudurg Rainfall : सिंधुदुर्गात मुसळधार, तरीही सरासरीपेक्षा कमीच

Crop Insurance : कोल्हापूर जिल्ह्यातील ४ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

SCROLL FOR NEXT