Sugarcane Rate Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Rate : ‘बिद्री’चा ३२०९ रुपये ऊसदर जाहीर

बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना यंदाच्या गळितास येणाऱ्या उसाला प्रतिटन ३२०९ रुपये दर देणार

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : बिद्री (Bidri) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना (Sri Doodhganga Vedganga Co-operative Sugar Factory ) यंदाच्या गळितास येणाऱ्या उसाला प्रतिटन ३२०९ रुपये दर (Sugarcane Rate) देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांनी दिली.

श्री. पाटील म्हणाले की, यंदाही जिल्ह्यातील ही उच्चांकी उचल आहे. गेली अनेक वर्षे महागाईबरोबर रासायनिक खते, कीटकनाशके यांच्या दराचा आलेख वाढतच आहे. परिणामी, साखरेचा हमीभाव वाढविणे गरजेचे आहे. कारखान्याने खर्चात काटकसरीचे धोरण नेहमीच अवलंबले असून, या माध्यमातून शेतकऱ्यांना जादा ऊसदर देण्याची भूमिका कारखान्याने कायम ठेवली आहे.

या वेळी उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले, सेक्रेटरी एस. जी. किल्लेदार, चीफ अकौंटंट एस. ए. कुलकर्णी, शेती अधिकारी बी. एन. पाटील यांच्यासह सर्व विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Rajan Patil: सहकार परिषद कृतिशील होईल

Indigenous Cattle: ही ‘लक्ष्मी’ जपणार कोण?

Agriculture Pest Infestation: मूग, उडीद पिकांवरील किडींचे व्यवस्थापन

Home Industry: नाचणी, भाजीपाल्याच्या पापडांची चव न्यारी

Rural Development: ग्रामविकास, बचत गटाला चालना देणारी ‘वनश्री’

SCROLL FOR NEXT