Bhushi Dam Agrowon
ताज्या बातम्या

Bhushi Dam : लोणावळ्यातील भुशी धरण भरले

Latest Rain Update : मावळ तालुक्यातील लोणावळा शहरात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे येथील पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण शुक्रवारी (ता. ३०) रात्री ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे.

Team Agrowon

Lonavala Rain News : मावळ तालुक्यातील लोणावळा शहरात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे येथील पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण शुक्रवारी (ता. ३०) रात्री ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे.

लोणावळा येथे शनिवारी (ता. १) २४ तासांत तब्बल १५८ मिमी पाऊस पडला. तर रविवारी (ता. २) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ५८ मिलिमीटर पाऊस पडला.

त्यामुळे लोणावळा शहरात येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र असलेले हे धरण ओसंडून वाहू लागले आहे. शनिवारी सकाळपासूनच पर्यटकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली.

मागील काही दिवसांपासून सलग पडणाऱ्या पावसामुळे डोंगरभागांतून मोठे-मोठे धबधबे वाहू लागले आहेत. त्यामुळे भुशी धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली आणि भुशी धरण अवघ्या पाच दिवसांत ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे.

स्थानिक युवकांनी धरणाच्या सांडव्यावरील मोऱ्यांची माती काढत पाण्याला वाट मोकळी करून दिली. गेल्या वर्षी जुलैमध्ये ६ तारखेलाच धरण ओव्हर फ्लो झाले होते. त्यामानाने यंदा ते लवकरच म्हणजे ३० जून रोजी ओव्हर फ्लो झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT