ताज्या बातम्या

Sugar Mill : भीमा साखर कारखाना इथेनॅाल प्रकल्प उभा करणार

आगामी काळात भीमा कारखाना बाजारपेठेची ही गरज लक्षात घेऊन इथेनॉल प्रकल्प उभा करणार असल्याचे भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, खासदार धनंजय महाडीक यांनी सांगितले.

टीम ॲग्रोवन

सोलापूर : केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल वापरण्यास परवानगी दिल्याने, इथेनॉलला मागणी वाढणार आहे. आगामी काळात भीमा कारखाना (Bheema Sugar Mill) बाजारपेठेची ही गरज लक्षात घेऊन इथेनॉल प्रकल्प (Ethanol Project) उभा करणार असल्याचे भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, खासदार धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) यांनी सांगितले.

टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या २०२२-२०२३ च्या ४३ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ प्रसंगी श्री. महाडीक बोलत होते. या वेळी मंगलताई महाडीक, विश्‍वास महाडीक, विश्‍वजित महाडीक, उपाध्यक्ष सतीश जगताप, शिवाजी गुंड,

भारत पाटील, सुरेश शिवपुजे, महादेव देठे, विक्रम डोंगरे, सज्जन पवार, दत्ता कदम, शंकर वाघमारे, संभाजी पाटील, राहुल व्यवहारे, ॲड. आबासाहेब शिंदे, तात्या नागटिळक, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे उपस्थित होते.

श्री. महाडीक म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकारमंत्री अमित शाह यांनी सहकारी साखर कारखानदारी संबंधित चांगले निर्णय घेतल्याने हा उद्योग स्थिरस्थावर झाला आहे. या वर्षीदेखील साखर निर्यातीला परवानगी मागितली आहे,

यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन मागणी केली आहे. येत्या १५ ऑक्टोबर रोजी यंदाच्या गाळप हंगामाला सुरुवात होईल. हंगामाच्या पहिल्या दिवसापासून वीजनिर्मिती केली जाणार आहे,

त्यासाठी भीमाच्या सभासदांसह इतर ऊस उत्पादकांनी इतर कारखान्यास ऊस न देता भीमालाच ऊस गाळपासाठी द्यावा, जेणेकरून आपल्याला चांगला दर देणे शक्य होईल, असे म्हणाले. प्रास्ताविक पांडुरंग ताटे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Red Sandalwood: लाल चंदन प्रकरणावर सहा महिन्यांत निर्णय घ्या

Farmer Support: टंचाईत शेतकऱ्यांना अडचणी भासू देऊ नयेत : पालकमंत्री बोर्डीकर

Farmer Support: गंभीर परिस्थितीत शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री भरणे

Drought Declaration Demands: प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे दुष्काळ जाहीर करा : झनक

Multi State Cooperative Society: एन साई मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला ७ कोटी ९ लाखांचा नफा : ठोंबरे

SCROLL FOR NEXT