Sugar Mill Agrowon
ताज्या बातम्या

Cooperative Sugar Mill Election : ‘सहकारशिरोमणी’साठी चुरस

भाळवणी (ता. पंढरपूर) येथील सहकारशिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या गुरुवारी (ता.१८) शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी तब्बल २६८ जणांचे अर्ज दाखल झाले.

Team Agrowon

Solapur News : भाळवणी (ता. पंढरपूर) येथील सहकारशिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या गुरुवारी (ता.१८) शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी तब्बल २६८ जणांचे अर्ज दाखल झाले.

सत्ताधारी चेअरमन कल्याणराव काळे यांना विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी आव्हान दिल्याने ही निवडणूक रंगतदार होणार आहे.

या आधी दोन दिवसांपूर्वी कल्याणराव काळे यांनी शक्तीप्रदर्शन करत आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते. त्यांना ‘विठ्ठल’चे माजी चेअरमन भगिरथ भालके, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष गणेश पाटील यांची साथ मिळाली आहे.

तर आता विरोधी गटाकडून अभिजित पाटील यांनीही मोठे शक्तीप्रदर्शन करत काळे यांना आव्हान दिले आहे. पाटील यांच्यासोबत प्रा.बी.पी. रोंगे हे आहेत. पण त्यांच्यासोबत आता काळेंचे कट्टर विरोधक दीपक पवार हेही एकत्र येण्याची शक्यता आहे.

गेल्या जवळपास २२ वर्षांपासून सहकारशिरोमणी कारखान्यावर काळे यांचे वर्चस्व आहे. पण पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पद्धतीने या निवडणुकीसाठी चुरस लागली आहे. त्यातच काळे यांनी बिनविरोधचा प्रस्ताव आल्यानंतरही विरोधकांना एकही जागा देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. तर त्याला उत्तर देताना अभिजित पाटील यांनी निवडणूक लागूच द्या, आम्ही सर्व जागा जिंकून आणू, असा विश्वास व्यक्त केला आहे.

‘मकाई’तून बागलांची ऐनवेळी माघार

करमाळ्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही आता ट्विस्ट आला आहे. या निवडणुकीसाठीही उमेदवारी अर्ज दाखलाचा गुरुवारी (ता.१८) शेवटचा दिवस होता. पण कारखान्याचे विद्यमान चेअरमन दिग्विजय बागल, रश्मी बागल किंवा त्यांच्या कुटुंबापैकी एकाही व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने चर्चांना उधाण आले आहे. कारखान्याच्या १७ जागांसाठी ७५ जणांचे अर्ज दाखल झाले आहेत.

तालुक्यातील मोहिते पाटील गट या निवडणुकीत मात्र पुन्हा सक्रिय झाला आहे. तर प्रा. रामदास झोळ हेही स्वतंत्र पॅनेलने यामध्ये उतरण्याची शक्यता आहे. कारखान्याचे संस्थापक दिगंबर बागल यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यातच आतापर्यंत कारखाना होता.

पण ऐनवेळी त्यांच्या माघारीने वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. वास्तविक, थकबाकीचे तांत्रिक कारण त्यामागे असल्याचे बोलले जाते, तर काहीजण यामागे वेगळे राजकारण असल्याचे बोलत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT