Fish Farming Agrowon
ताज्या बातम्या

Mangur Fish : बंदी असलेला मांगूर मासा‘इन्सिनेटर’मध्ये नष्ट करणार

केंद्र शासनाच्या आदेशानुसार विदेशी मांगुर (थाई मांगुर/आफ्रिकन मांगुर) या माशांचे मत्स्यसंवर्धन करणे, वाहतूक व विक्री करण्यास बंदी आहे.

Team Agrowon

नाशिक : केंद्र शासनाच्या आदेशानुसार विदेशी मांगुर (थाई मांगुर/आफ्रिकन मांगुर) (Mangur Fish) या माशांचे मत्स्यसंवर्धन (Mangur Fish Conservation) करणे, वाहतूक व विक्री करण्यास बंदी आहे. विदेशी मांगुर हा अति मांसाहारी मासा आहे. यामुळे मानवास हानिकारक कर्करोगजन्य आजार अथवा इतर आजार होण्याची शक्यता असते.

मानवी आरोग्याला हानिकारक मांगुर मासा विकताना अथवा उत्पादन घेताना आढळून आल्यास मत्स्य व्यवसाय विभाग (Department Of Fisheries) महापालिकेच्या इन्सिनेटर म्हणजेच विद्युत भट्टीमध्ये विल्हेवाट मशिनमध्ये नष्ट करणार आहे. यासंबंधी नाशिक महापालिकेने परवानगी दिली आहे.

शासनाने १९ डिसेंबर १९९७ आणि राष्ट्रीय हरीत लवाद, नवी दिल्ली यांचा निर्णय दि २२ जानेवारी २०१९ अन्वये या माशांच्या मत्स्यसंवर्धन, वाहतूक, विक्रीवर बंदी घातली आहे.

सध्या नाशिक विभागामध्ये येणाऱ्या नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांमध्ये मांगुर मासा निर्मिती व विक्रीवर मत्स्यव्यवसाय विभाग बारकाईने नजर ठेवून आहे.

नाशिक महापालिकेच्या चाळीस किलोमीटर परिघात मांगुर मासा आढळून कारवाई केल्यास नाशिक महापालिकेच्या इन्सिनेटरमध्ये या माशाची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

मत्स्य व्यवसाय विभागाने नाशिक महापालिकेला यासंबंधी पत्र दिले होते. यावर नाशिक महापालिकेने तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहे.

कारवाई करून जप्त केलेल्या माश्यांचा साठा महापालिकेच्या खत प्रकल्पात असलेल्या इन्सिनेटरमध्ये नष्ट करण्यात येणार आहे.

यंत्रणेचे कष्ट वाचणार

विभागामार्फत नाशिक मनपा क्षेत्रातील मासळी बाजार, मासळी विक्रेते आदी ठिकाणच्या विदेशी मांगुर साठ्यांवर कारवाई सुरू आहे. या कारवाई दरम्यान मासळी साठे जप्त करून नष्ट करणे आवश्यक आहे.

त्याअनुषंगाने महानगरपालिकाच्या आधिपत्याखाली कचरा प्रकल्प येथील इन्सिनेटरमध्ये मांगुर साठा नष्ट करण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार आता नाशिक महानगरपालिकेची विद्युत भट्टीमध्ये नष्ट करण्याची परवानगी मिळाली.

त्यामुळे आत्ता परिसरातील साधारण ४० किमीमध्ये कारवाई झाल्यानंतर या ठिकाणी मासळी नष्ट केली जाईल. परिणामी जेसीबी आणून खड्डा करणे, मासळी टाकून ब्लिचिंग टाकणे असे कष्ट वाचणार आहे, अशी माहिती मत्स्य व्यवसाय उपायुक्त संजय वाटेगावकर यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Seed Storage : सोयाबीन बियाणे सुरक्षित ठेवण्यासाठी कृषी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

Turmeric Crops : हळद उत्पादक शेतकरी हवालदिल! करप्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हळद पीक आले अडचणीत

Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक निवडणूक: शिक्षकांच्या मतांवर कोणाचा ताबा? मतविभाजन ठरणार निर्णायक

FFS App Fertilizer Booking : खत खरेदी आता झाली डिजिटल; २२ तारखेपासून घरबसल्या करा ऑनलाईन बुकिंग

Canal Water Release : पाण्याचा प्रश्न ऐरणीवर: बंधारे भरण्यासाठी कॅनॉलमधून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची आर्त हाक

SCROLL FOR NEXT