Banana Market Rate Agrowon
ताज्या बातम्या

Banana Market : खानदेशात केळी आवक आणि दर स्थिर

Banana Rate : खानदेशात केळीचे किमान दर ५०० ते ७०० रुपये आणि कमाल १२०० ते १३०० प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत.

Team Agrowon

Jalgaon news : खानदेशात केळीचे किमान दर ५०० ते ७०० रुपये आणि कमाल १२०० ते १३०० प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत. प्रतिदिन सरासरी १९० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. आवक स्थिर असून, केळीला उठावही आहे.

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथे लिलाव रखडत सुरू आहेत. तेथेही सध्या प्रतिदिन १५० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळी आवक होत आहे.

परंतु सुरुवातीला पाच ते सहा ट्रकमधील केळीचा लिलाव तेथे होतो. नंतर लिलाव होत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीबाहेरील खरेदीदारांना केळी विक्री करावी लागत असून, कमी दर मिळत आहेत. खानदेशात खेडा खरेदी किंवा शिवार खरेदीत दर्जेदार किंवा निर्यातक्षम केळीला कमाल १३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

केळीची निर्यातही सध्या रखडत सुरू आहे. आखातातील बहरीन, इराण, इराक, युएई, कतार या भागात केळी पाठवणूक सुरू आहे. जळगावमधून आखातात रोज सहा ते सात कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळी पाठवणूक सुरू आहे. तर नंदुरबारमधील शहादा,

तळोदातून रोज दोन कंटेनर केळी परदेशात पाठवली जात आहे. सहा कंपन्या निर्यातीचे काम करीत आहेत. पण निर्यातीच्या केळीचे दरही फारसे वधारलेले नाहीत. स्थानिक किंवा उत्तर भारतातील बाजारात केळीला उठाव आहे. जळगावमधून रोज ३० ते ४० ट्रक केळी पाठवणूक फैजपूर (ता. यावल), सावदा (ता. रावेर) आदी भागांतील एजंट करीत आहेत.

दरात अपेक्षित सुधारणा नाही

केळीची आवक टिकून असल्याने दरात हवी तशी वाढ दिसत नसल्याचे जाणकार सांगत आहेत. पुढे निर्यातीचे काम कमी होईल. यामुळे केळी आवकेचा स्थानिक बाजारातील दबाव वाढू शकतो. कमी दर्जाच्या केळीची काढणीही सुरू आहे.

या केळीचे दर कमाल ७०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. नागपूर, छत्तीसगड भागात या केळीची पाठवणूक केली जात आहे. मध्य प्रदेश, गुजरातमधूनही केळीची आवक उत्तर भारतात होत आहे. यामुळे दरात हवी तशी सुधारणा सध्या दिसत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT