Fertilizer Agrowon
ताज्या बातम्या

Fertilizer Linking : लिंकिंगच्या ३६ लाखांच्या साहित्याच्या विक्रीस बंदी

Fertilizer : युरियासोबत इतर खतांचे लिंकिंग केले जात असल्याने कंपन्यांच्या या धोरणाला शेतकरीच नाही तर विक्रेतेही वैतागले होते.

Team Agrowon

Gondia News : युरियासोबत इतर खतांचे लिंकिंग केले जात असल्याने कंपन्यांच्या या धोरणाला शेतकरीच नाही तर विक्रेतेही वैतागले होते. परिणामी खत विक्रीवर बहिष्काराची घोषणा करताच कृषी विभागाने जिाल्ह्यात तब्बल ३६ लाख २८ हजार रुपयांच्या लिंकिंग साहित्यावर विक्रीबंदचे आदेश दिले आहेत.

पेरण्यासाठी शेतकऱ्यांकडून युरियाला मागणी असल्याने कंपन्यांकडून युरियासोबत इतरही खते शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत. विक्रेत्यांना देखील युरियासोबत इतर खते घेतली तरच युरियाचा पुरवठा होतो. त्यामुळे शेतकरीच नाही तर विक्रेतेही त्रस्त झाले होते.

कंपन्यांच्या या मनमानी विरोधात एकत्रित येत गोंदिया जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रधारकांनी मंगळवार (ता.१८) पासून खत विक्रीवर बहिष्काराचा निर्णय घेतला होता. यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी, कृषी विभागाला देण्यात आले होते.

त्याआधारे खत विक्रेत्या कंपन्यांना लिंकिंग न करण्याचे आदेश देण्यात आले. कृषी केंद्रधारक व कंपन्यांनी खताची लिंकिंग न करण्याचे मान्य केले. त्यानंतर कृषी विभागाच्या भरारी पथकाने लिंकिंग साहित्यावर विक्रीबंदचे आदेश दिले. या साहित्याची किंमत ३६ लाख २८ हजार रुपये इतकी आहे.

बहिष्कार मागे

जिल्हा परिषदेचे कृषी सभापती कुथे यांनी विक्रेते, कंपन्या तसेच कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत लिंकिंग साहित्याचा पुरवठा न करण्यावर एकमत झाले. त्यामुळे निविष्ठा विक्रीवरील बहिष्कारही मागे घेण्याची घोषणा करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Subsidy: शेतकऱ्यांना वीज अनुदान, धानासाठी प्रति क्विंटल २,७०० रुपये हमीभाव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

Flower Growers: पातूरच्या शेतकऱ्यांनी जोपासली फुलशेतीची परंपरा

Pokhara 2.0 Scheme: पोकरा 2.0 अंतर्गत हरितगृह, शेडनेटमधील भाजीपाला व फुलांना सहाय्य; जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया

Rural Development: कल्पनाताईंनी समर्थपणे सांभाळली ‘ग्राम गौरव’ची धुरा

Lakhpati Didi Scheme: लखपती दीदी २.०! महिलांना मिळणार ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया

SCROLL FOR NEXT