Eknath Shinde Agrowon
ताज्या बातम्या

Eknath Shinde : ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ आता राज्यभर

मुंबई आणि ठाणे परिसरात ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

Team Agrowon

Balasaheb Thackeray Clinic : वर्धा ः ‘‘मुंबई आणि ठाणे परिसरात ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ (Balasaheb Thackeray Clinic) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सर्वसामान्यांच्या प्राथमिक आरोग्यविषयक गरजा पूर्ण करणारा हा उपक्रम लवकरच संपूर्ण राज्यात सुरू करण्यात येईल,’’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले.

दत्ता मेघे शिक्षण व संशोधन संस्थेच्या सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील थ्री टेस्ला आणि ‘एमआरआय’चे उद्‍घाटन शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ३) झाले.

या वेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी खासदार दत्ता मेघे, आमदार समीर मेघे, आमदार डॉ. पंकज भोयर, सागर मेघे आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, ‘‘सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या योजनेचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल. दैनंदिन आजारांसाठी प्रभावीपणे या दवाखान्यांच्या माध्यमातून उपचार मिळतील.’’

‘‘दत्ता मेघे शिक्षण व संशोधन संस्थेकडून रुग्णसेवेचे ईश्‍वरीय कार्य करण्यात येत आहे. माजी खासदार दत्ता मेघे यांनी अगदी विपरीत परिस्थितीत आरोग्य सेवेची सुरुवात केली. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या भूमीत रुग्णसेवेचे मोठे कार्य त्यांनी सुरू केले.

हा वारसा मेघे यांच्या दोन्ही मुलांनी पुढे सुरू ठेवला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना आरोग्य सुविधा मिळत आहेत,’’ असेही शिंदे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT