Millet Agrowon
ताज्या बातम्या

Millet Year : हिंगोलीत प्रभार फेरीद्वारे तृणधान्यविषयक जनजागृती

सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचारी, नागरिकांनी, ‘नाचणीचे लाडू लागतात गोड, पचनशक्तीला नाही तोड’ अशा घोषणा, तृणधान्य आधारित अभंग, पोवाडे इत्यादीद्वारे जनजागृती करण्यात आली.

Team Agrowon

Hingoli News : पौष्टिक तृणधान्य (Millet) पिकातील पोषण मूल्य व त्यांच्या सेवनामुळे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम जनसामान्यांच्या लक्षात येण्यासाठी कृषी विभागामार्फत आयोजित पौष्टिक तृणधान्य प्रभात फेरीला पुणे येथील कृषी आयुक्तालयाच्या कृषी अधिकारी नीलम बोरकर यांच्या हस्ते मंगळवारी (ता. २८) येथील जिल्हा परिषद शाळा येथून हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला.

प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले. कृषी उपसंचालक एस. व्ही. लाडके आदी उपस्थित होते. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वाचनालय येथे पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व या विषयावर डॉ. संजय घुगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

ही प्रभात फेरी जिल्हा परिषद शाळा-पिपल्स बँक-आखरे मेडिकल पॉईट-जवाहर रोड-गांधी चौक-इंदिरा गांधी चौक या मार्गे काढण्यात येऊन अण्णा भाऊ साठे वाचनालय येथे समारोप झाला.

सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचारी, नागरिकांनी, ‘नाचणीचे लाडू लागतात गोड, पचनशक्तीला नाही तोड’ अशा घोषणा, तृणधान्य आधारित अभंग, पोवाडे इत्यादीद्वारे जनजागृती करण्यात आली. नगरपालिका प्रशासनाचे सहकार्य लाभले.

आंतरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ या संकल्पनेअंतर्गत ज्वारी, बाजरी, नाचणी इत्यादी पौष्टिक तृणधान्य पिकाच्या उत्पादन वाढीबरोबरच या पिकांच्या आरोग्यविषयक फायद्यांबाबत जनजागृती करून आहारातील त्यांचे प्रमाण वाढविणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT