Rain Alert
Rain Alert Agrowon
ताज्या बातम्या

Nagpur Rain : नागपूर विभागात सरासरी ७५.६ मिलिमीटर पाऊस

टीम ॲग्रोवन

नागपूर : विभागात गेल्या चोवीस तासांत सरासरी ७५.६ मिलिमीटर पावसाची (Nagpur Rainfall) नोंद झाली आहे. विभागात ३३ तालुक्यांत अतिवृष्टी (Heavy Rain) झाल्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्हानिहाय अतिवृष्टी झालेल्या तालुक्यांमध्ये वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात १९०.५, समुद्रपूर १८७.१, वर्धा १३७.४, देवळी १३१ .४, सेलू १२७.२, आर्वी ८७.१, कारंजा ७०, आष्टी ६६.४ मिलिमीटर.

गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली येथे १८४.४, धानोरा १०८.९, चामोर्शी १०४.१, मुलचेरा, ९०.३, देसाईगंज वडसा ८६.१, भामरागड ८०.३, कुरखेडा ८०.२, आरमोरी ७८.६ मिलिमीटर.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात १६३.१, सावली १३१.४, वरोरा १११.५, सिंदेवाही ९४.४, ब्रम्हपुरी ८९.९, नागभीड ८४.७, बल्लारपूर ६६ मिलिमीटर.

नागपूर जिल्ह्यात भिवापूर तालुक्यात १३०.७, उमरेड १०३, कुही ७९, रामटेक ६९.६, कामठी ६७.८, हिंगणा ६५.६ मौदा ६५ मिलिमीटर.

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात ८४.९, लाखांदूर ७३.३, गोंदिया जिल्ह्यातील मोरगांव अर्जुनी तालुक्यात ६६.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

विभागात चोवीस तासांत जिल्हानिहाय सरासरी झालेला पाऊस कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. वर्धा १३६.४ (६६५.४), चंद्रपूर ८५.८ (७४७.४), गडचिरोली ८४.९ (६४०.३) नागपूर ६४.३ (६०७.३), भंडारा ४८ (५५५.४) आणि गोंदिया ३०.८ (६२२.९), पाऊस झाला आहे. सर्व आकडेवारी मिलिमीटरमध्ये आहेत. नागपूर विभागात दि. १ जून ते १८ जुलैपर्यंत सरासरी ६४०.६ मिलिमीटर पाऊस पडला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT