Farmer Scheme  Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Accident Insurance : ‘अपघात विमा’ योजनेतून ५९ शेतकरी कुटुंबांना मदत

Agriculture Scheme :गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या मदतीसाठी जिल्ह्यातून ६१ प्रस्ताव दाखल झाले.

Team Agrowon

Solapur News : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या मदतीसाठी जिल्ह्यातून ६१ प्रस्ताव दाखल झाले. त्यापैकी ५९ शेतकरी कुटुंबीयांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यांना पैसेही देण्यात आले आहेत. उर्वरित दोन प्रस्तावही मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. आतापर्यंत सुमारे १ कोटी १८ लाख रुपयांचा निधी त्यासाठी खर्च झाला आहे.

या योजनेतून रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून होणारी हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे, चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू, दंगल व अन्य कोणत्याही कारणाने शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास ते या मदतीसाठी पात्र आहेत.

प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत त्यातून देण्यात येते. या योजनेवर एक कोटी १८ लाख रुपये निधी खर्च झाला असून, आणखी ८ लाख रुपयांचा निधी शिल्लक आहे. या योजनेतील प्राप्त प्रस्तावांची छाननी करून पात्र असलेल्या विमा प्रस्तावातील संबंधित शेतकरी, शेतकरी कुटुंबाच्या वारसदारांच्या बँक खात्यात निधी अदा करण्यात आला आहे, असे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

दोन प्रस्ताव प्रलंबित

पंढरपूर- ५, सांगोला-८, मंगळवेढा-३, माळशिरस-१०, मोहोळ-७, माढा-६, करमाळा-४, बार्शी-४, दक्षिण सोलापूर-६, उत्तर सोलापूर-४, अक्कलकोट- ४ असे एकूण ६१ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ५९ प्रस्तावास निधी वितरित केलेला आहे. दक्षिण सोलापुरातील दोन प्रस्तावांनाही लवकरच मंजुरी मिळेल. हे प्रस्ताव गेल्याच आठवड्यात कृषी कार्यालयाकडे प्रलंबित आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT