Citrus Estate Agrowon
ताज्या बातम्या

Asian Citrus Congress : नागपुरात ऑक्टोबरमध्ये एशियन सिट्रस काँग्रेस

Latest Agriculture News : ‘‘लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या वतीने २८ ते ३० ऑक्‍टोबर या कालावधीत ‘एशियन सिट्रेस काँग्रेस २०२३’चे नागपुरात आयोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Nagpur News : ‘‘लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या वतीने २८ ते ३० ऑक्‍टोबर या कालावधीत ‘एशियन सिट्रेस काँग्रेस २०२३’चे नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातील लिंबूवर्गीय पीक संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांची मांदियाळी राहील,’’ अशी माहिती लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे संचालक डॉ. दिलीप घोष यांनी दिली.

‘‘केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर, एशिया पॅसिफिक असोसिएशन ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट, बॅंकॉक (थायलंड), कोरियन सोसायटी फॉर सिट्रस ॲण्ड सबट्रॉपिकल क्‍लायमेट फ्रूट्‍स, साउथ कोरिया यांच्या संयुक्‍त सहकार्याने हा कार्यक्रम होईल.

लिंबूवर्गीय फळ पीक हे उत्पादक, प्रक्रिया उद्योजकांसाठी आर्थिकस्रोत ठरला आहे. त्यामुळेच या क्षेत्रात नवसंशोधन, माहितीचे आदानप्रदान, खरेदीदार, विक्रेत्यांचे संमेलन, लिंबूवर्गीय फळपीक संशोधन, उत्पादन व बाजारपेठ या क्षेत्रातील आव्हाने आदी विषयांवर त्यात चर्चा होईल,’’ असे डॉ. घोष यांनी सांगितले.

एशियन सिट्रेस काँग्रेसच्या पार्श्‍वभूमीवर खास लोगोचे अनावरण करण्यात आले आहे. त्या आधारे या पिकातील जैवविविधता रंग, दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासोबतच ज्या एशियन देशात संत्रा उत्पादन होते, ते भागही लोगोत दाखविले आहेत.

आयोजन समितीमध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक, उद्यानविद्या विज्ञान शाखेचे उपसंचालक डॉ. ए. के. सिंग, शास्त्रज्ञ निवड समितीचे माजी अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, संचालक डॉ. दिलीप घोष यांचा समावेश आहे.

दरम्यान, जगातील १५० देशांमध्ये लिंबूवर्गीय फळपिकांची लागवड होते. २०२१ मध्ये उत्पादनक्षम ५.४२ लाख हेक्‍टर क्षेत्रातून ८३.५९ टन फळांचे उत्पादन झाले. एशिया खंडात गेल्या दशकात उत्पादनक्षम क्षेत्र २५.५ टक्क्यांवरून ४२.५ टक्‍क्यांपर्यंत विस्तारले आहे.

आंतरराष्ट्रीय आयोजन समिती अशी...

आंतरराष्ट्रीय आयोजन समितीमध्ये डॉ. क्‍वॉन सॉग (दक्षिण कोरिया), डॉ. रवी खेटरपाल (थायलंड), डॉ. ज्युलियाना फ्रेटॉस (ब्राझील), डॉ. स्वॉडेशमुकुल सॅंट्रा (यूएसए), डॉ. डॉग-सुन किम (साउथ कोरिया), डॉ. एम. एस. रेड्डी (यूएसए), डॉ. के. एल. चंद्रा (भारत), डॉ. एस.पी. घोष (भारत), बी. एन. महातो (नेपाळ), डॉ. त्रिप्ती वशिष्ठ (यूएसए), डॉ. उमेश आचार्य (नेपाळ), डॉ. नॅग्वे बाओ क्‍वॉक (व्हिएतनाम), डॉ. डी. एम. जे. बी. सेनायके (श्रीलंका), डॉ. रेट्रो बॅसेन्झी (ब्राझील), भिमू पाटील (यूएसए), डॉ. त्रिलोचन मोहपात्रा (भारत), डॉ. बिनोद साह (नेपाळ), डॉ. अली ओझस्कॅन (तुर्की), डॉ. सिद्धार्मे गोवडा (यूएसए), डॉ. एच. पी. सिंग (भारत), डॉ. एन. कृष्णा कुमार (भारत), डॉ. जिग्मे टेन्झीन (भुतान), डॉ. मंजुल दत्त (यूएसए), डॉ. नॅग्वेन व्हॅन होआ (व्हिएतनाम), डॉ. एम. अंगामुथ्था (भारत) यांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT