Soybean Agrowon
ताज्या बातम्या

Soybean : अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन घटणार

अर्जेंटीनात सध्या दुष्काळी स्थिती असल्याने सोयाबीन पेरणी पिछाडीवर आहे. त्यामुळे यंदा अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Team Agrowon


पुणेः अर्जेंटीनात सध्या दुष्काळी स्थिती असल्याने सोयाबीन पेरणी (Soybean Sowing) पिछाडीवर आहे. त्यामुळे यंदा अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन (Soybean Production) कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी जागतिक सोयाबीन उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. 

जगातिक पातळीवर सोयाबीन उत्पादनात ब्राझील आणि अमरिकेनंतर अर्जेंटीना तिसऱ्या  स्थानावर आहे. यंदा भारत आणि अमेरिकेतील सोयाबीन उत्पादनाला पाऊस आणि दुष्काळाच फटका बसला. मात्र ब्राझील आणि अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन वाढून यंदा जागतिक उत्पादनही अधिक राहील, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने व्यक्त केला होता.

अर्जेंटीनातील सोयाबीन पेरणी सध्या सुरु आहे. मात्र अनेक भागांना कमी पाऊस आणि उष्णतेचा फटका बसत आहे. महत्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये दुष्काळी स्थिती असल्यामुळे पेरणीचा वेग कमी आहे. अर्जेंटीनामध्ये आतापर्यंत सोयाबीनचा केवळ ३७ टक्के पेरा पूर्ण झाला. गेल्यावर्षीपेक्षा हा पेरा खूपच कमी आहे.

अर्जेंटीनातील महत्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये दुष्काळी स्थिती भीषण पातळीवर पोचली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत १६७ लाख हेक्टरवरच सोयाबीनची पेरणी झाली. कमी पावसामुळे आता अर्जेंटीनातील एकूण सोयाबीन लागवड कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. परिणामी यंदा अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादनही घटण्याची शक्यता आहे.

मागील हंगामातही अर्जेंटीनात उत्पादन घटले होते. गेल्यावर्षी अर्जेंटीनात ४३९ लाख टन सोयाबीन उत्पादन झाले होते. तर युएसडीएच्या मते यंदा ४९५ लाख टन उत्पादन होईल. म्हणजेच उत्पादनात ५६ लाख टनांनी वाढ होईल, असा अंदाज आहे. मात्र प्रत्यक्ष दुष्काळी स्थिती असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
………….
मागील साठा नगण्य
तसेच अर्जेंटीनाने मागील हंगामातील जवळपास ७५ टक्के सोयाबीनची विक्री केली. मागीलवर्षी ब्राझील आणि अर्जेंटीना या दोन्ही देशांमध्ये उत्पादन घटल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढले होते. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात चीनसह इतर देशांनी सोयाीबनची खरेदी वाढवली होती. यात अर्जेंटीनातून होणारी विक्री वाढली होती. 

………..
बाजारावर परिणाम
आता यंदाही अर्जेंटीनातील उत्पादन वाढण्याची शक्यता नाही. भारत आणि अमेरिकेतील उत्पादन घटलेले आहेत. त्यामुळे जागतिक सोयाबीन अपेक्षेपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे. अर्जेंटीनातील या स्थितीचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावरही होत आहे. आजही सोयाबीनचे वायदे काहीसे वाढून १४.७८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले. आंतरराष्ट्रीय बाजारात दर सुधारल्याचा सकारात्मक परिणाम देशातील बाजारावर होऊ शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Management: कमी पावसाच्या स्थितीत चाऱ्याचे आत्तापासून करा नियोजन

Gharkul Yojana : सोलापुरात ३ हजारांहून अधिक घरकुल लाभार्थींना ७२२२ ब्रास वाळूचे वाटप

Weed Removal Begins: भात, नाचणी पिकांत तण काढणी सुरू

Sugarcane Dues : जिल्ह्यात ३३७ कोटींची ऊसबिले अद्यापही थकीत

Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस; पण आंदोलनावर ठाम

SCROLL FOR NEXT