Areca Nut Agrowon
ताज्या बातम्या

Supari Crop : फळगळतीमुळे सिंधुदुर्गातील सुपारी उत्पादक संकटात

Areca Nut Fruit Fall : पावसाचा जोर ओसरल्यानंतर आता मोठ्या प्रमाणात फळगळ होऊ लागली असून बागांमध्ये फळांचा खच साचलेला दिसून येत आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : जुलैमध्ये सलग २० दिवस झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका सुपारी पिकाला बसला आहे. पावसाचा जोर ओसरल्यानंतर आता मोठ्या प्रमाणात फळगळ होऊ लागली असून बागांमध्ये फळांचा खच साचलेला दिसून येत आहे. त्यामुळे सुपारी बागायतदार संकटात सापडले असून नुकसानीचे पंचनामे देखील केले जात नसल्यामुळे बागायतदारांमध्ये नाराजी आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ला, देवगड या किनारपट्टीच्या तालुक्यांसह कुडाळ, सावंतवाडी आणि दोडामार्गात मोठ्या प्रमाणात सुपारीची लागवड आहे. नारळ बागांमध्ये आंतरपीक म्हणून देखील सुपारीची लागवड केली जाते. या भागातील सुपारीला दर देखील चांगला मिळतो.

मात्र गेली दोन, तीन वर्षे वातावरणातील बदलाचा सुपारीला फटका बसू लागला आहे. मागील दोन वर्षांप्रमाणे जिल्ह्यात या वर्षीदेखील सुपारी बागायतदारांना फळगळीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. अर्धपरिपक्व झालेली हजारो फळे गळून पडत असल्याचे चित्र सुपारीच्या बागांमध्ये दिसून येत आहे.

जुलै महिन्यात २० पेक्षा अधिक दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे हे संकट उभे राहिले आहे. सुपारीच्या झाडांवरील सर्वच फळे गळून पडत असल्याने सुपारी उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच नुकसानीचे पंचनामेच केले जात नसल्याने बागायतदारांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

मालवण तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी तर तालुका कृषी कार्यालयात जाऊन यासंदर्भात अधिकाऱ्यांना जाब देखील विचारला आहे. सुपारीचे ८० टक्के नुकसान होऊन देखील पंचनामे केले जात नाहीत ही शोकांतिका असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

अतिवृष्टीचा मोठा फटका सुपारी पिकाला बसला आहे. मात्र पिकाच्या नुकसानीचे पंचनामे देखील कृषी विभागाने केलेले नाहीत. त्यामुळे या प्रश्‍नी आपण शासनाचे लक्ष वेधणार आहे.
- भाऊ सामंत, सुपारी उत्पादक, घुमडे, ता. मालवण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT