College Of Veterinary Medicine  Agrowon
ताज्या बातम्या

Akola Veterinary College : अकोल्यातील नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयास मान्यता

Animal Husbandry News : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला यंदापासून अकोला येथे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता देण्याचा आदेश राज्य सरकारने काढला आहे.

Team Agrowon

Mumbai News : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला यंदापासून अकोला येथे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता देण्याचा आदेश राज्य सरकारने काढला आहे. एप्रिल महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीत या महाविद्यालयास मान्यता देण्यात आली होती.

राष्ट्रीय पशू विज्ञान अकादमी, नवी दिल्ली या संस्थेने सादर केलेल्या अहवालानुसार, देशात सद्यःस्थितीत ५० टक्के पशुवैद्यकांची कमतरता आहे.

२०३५ पर्यंत सव्वा लाख पशुवैद्यकांची आवश्यकता भासेल, असे अहवालात नमूद केले होते. महाराष्ट्रात आलेल्या लम्पी स्कीन रोगाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बाहेरून सेवा घेण्यात आली.

सध्या राज्यात पशुसंवर्धन सेवा देण्यास अपुरे मनुष्यबळ असल्याने नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

एकूण १६४ पदांना मान्यता

अकोला येथे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय २०२३-२४ च्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येईल. यासाठी शिक्षक संवर्गातील ५६, शिक्षकेत्तर संवर्गातील ४८, तसेच बाह्यस्रोतांद्वारे ६० पदे अशा एकूण १६४ पदांना मान्यता देण्यात आली आहे. मनुष्यबळ तसेच कार्यालयीन खर्चासाठी ५८ कोटी ९ हजार रुपयेही मंजूर करण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

Crop Damage: मे, जूनमध्ये पावसामुळे ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; कृषी विभागाची माहिती

Goras Bhandar Closure: गोरस भंडारावर कारवाई; दररोज होणाऱ्या ३ हजार ५०० लिटर दूध संकलनावर परिणाम

Offline Fertilizer Purchase: ...तोपर्यंत ऑफलाइन खत खरेदी सुरू ठेवा: शेतकरी संघटना

Banana Rate: खानदेशात केळी दर २९०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT