Mahabeej Agrowon
ताज्या बातम्या

Mahabeej : ‘महाबीज’च्या संशोधनाबाबत डवले यांच्याकडून कौतुक

‘महाबीज’चे अध्यक्ष तथा राज्याचे प्रधान सचिव (कृषी) एकनाथ डवले यांनी पैलपाडा येथील महाबीजच्या ६० एकरांवरील संशोधन प्रक्षेत्रात ‘महाबीज सेंटर ऑफ एक्सलन्स’ येथे भेट दिली.

टीम ॲग्रोवन

अकोला ः ‘महाबीज’चे (Mahabeej) अध्यक्ष तथा राज्याचे प्रधान सचिव (कृषी) एकनाथ डवले (Eknath Dawale) यांनी पैलपाडा येथील महाबीजच्या ६० एकरांवरील संशोधन प्रक्षेत्रात ‘महाबीज सेंटर ऑफ एक्सलन्स’ (Mahabeej Center Of Excellence)येथे भेट दिली. येथे सुरू असलेल्या संशोधन विषयक कामाबाबत संशोधन पथकाचे कौतुक केले.

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) संचालक मंडळाची बैठक डवले यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी महाबीजचे नवनियुक्त संचालक वल्लभराव देशमुख, डॉ. रणजित सपकाळ, व्यवस्थापकीय संचालक संतोष आळसे, प्रशासन महाव्यवस्थापक डॉ. प्रफुल्ल लहाने आदी उपस्थित होते.

डवले यांनी या वेळी महाबीजच्या संशोधित वाणांची पाहणी केली. जैविक खते प्रयोगशाळा, महाबीज रोपवाटिका तसेच संशोधन कामकाजाचा आढावा घेऊन संबंधितांना मार्गदर्शक सूचना केल्या.

दुपारच्या सत्रात संचालक मंडळाच्या सभेत महाबीज व शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात आले. रिक्त असलेल्या महाव्यवस्थापक या पदासाठी पात्र उमेदवारांची निवड समितीसमोर मुलाखत घेतली. यात उत्पादन महाव्यवस्थापक विवेक ठाकरे आणि प्रशांत पागृत यांची प्रक्रिया महाव्यवस्थापक या पदावर निवड जाहीर करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT