Farmer Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Insurance : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी करा अर्ज

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत ७ एप्रिल ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अपघातात मृत्यू पावलेल्या अथवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांनी अथवा त्याच्या वारसदारांनी प्रस्ताव सादर केले.

Team Agrowon

सोलापूर : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा (Farmer Insurance) योजनेअंतर्गत ७ एप्रिल ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अपघातात मृत्यू पावलेल्या अथवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांनी (Farmer) अथवा त्याच्या वारसदारांनी प्रस्ताव सादर केले नसल्यास विहित नमुन्यात व आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

श्री. शंभरकर आणि शिंदे म्हणाले, की ही योजना ७ एप्रिल ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीकरिता खंडित झाली होती. तथापि, शासन निर्णयानुसार उपरोक्त कालावधीतील प्राप्त विमा दाव्यांना तपासणी नंतर मंजुरी देण्यात येणार आहे.

तरी सोलापूर जिल्ह्यातील ७ एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अपघातात मृत्यू पावलेल्या अथवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या वारसदारांनी प्रस्ताव सादर केले नसल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांच्याशी तत्काळ संपर्क साधून विहित नमुन्यात व आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maize Varieties: एल निनोच्या परिस्थितीशी सामना करु शकणारे मक्याचे वाण

Farmer Issues: सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी : हर्षवर्धन सपकाळ

Yeola Rain Damage: येवल्यात वादळी वाऱ्यासह पावसाने दाणादाण

Nashik Onion Farmer Crisis: कांद्याला कवडीमोल भाव, नाशिकमधील शेतकऱ्याचा बळी घेतला, राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया

Illegal Tree Cutting: सातारा- लोणंद मार्गावर बेकायदा वृक्षतोड अन् वाहतूक

SCROLL FOR NEXT