Lumpy Skin Disease
Lumpy Skin Disease Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करा

टीम ॲग्रोवन

नागपूर : पशुधनावरील (Livestock)लम्पी चर्मरोगाचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव नागपूर (Nagpur District) विभागात आढळून आला असून, आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा नियोजन योजनेतून एक कोटी रुपयाचा निधी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. बाह्यस्रोतांद्वारे ५३ पशुधन पर्यवेक्षकांची पदे भरण्याची कार्यवाही गतीने करावी, असे आदेश अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे (Dr. Madhavi Khode Chavere) यांनी दिले.

राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याला मुबलक लसी उपलब्ध करून दिल्या आहेत. जनावरांमध्ये लक्षणे दिसताच औषधोपचार केल्यास जीवितहानी होणार नाही. त्यामुळे गोपालक व शेतकऱ्याने पशुधनाच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत लम्पी चर्मरोग प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपायुक्त मिलिंदकुमार साळवे, आशा पठाण, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.

डॉ. खोडे-चवरे म्हणाल्या, ‘पशुधनावरील लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संसर्गित क्षेत्रातील पशुधनांचे लसीकरण, गुरांची खरेदी-विक्री बंदी, गोठ्यात फवारणी, आदी उपाययोजना तातडीने कराव्यात. पशुधनांचे लसीकरण करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला दहा हजार याप्रमाणे लसींचा पुरवठा होणार आहे.’’

अतिरिक्त विभागीय आयुक्तांच्या सूचना.. बाधित क्षेत्राच्या पाच किलोमीटर परिसरातील पशुधनास तातडीने लसीकरण करावे.

प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनावरे वेगळी ठेवण्याबाबत प्रत्येक गावांत ग्रामपंचायतीमार्फत सूचना द्याव्यात. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी. पशुपालकांची भीती घालवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जनजागृती करावी. पशुधनास वेळेवर उपचार मिळाले पाहिजे, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. पशुधनांवर तत्काळ उपचार करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती योजनेतून प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी रुपये खर्च करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाने प्रभावी नियोजन व उपाययोजनांना गती द्यावी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT