Alternaria fungus on cotton Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Disease : कपाशीवर अल्टरनेरिया बुरशी

Team Agrowon

यवतमाळ : अतिवृष्टीनंतरही (Heavy Rain) कपाशीची स्थिती समाधानकारक होती. दोन-तीन वेचण्या होतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र कपाशीवर (Cotton) अचानक ‘अल्टरनेरिया’ या बुरशी रोगाचे आक्रमण झाले. याचा परिणाम फूल, पातीवर होत आहे, त्यामुळे एका वेच्यातच कापसाची उलगंवाडी होण्याचा धोका कृषी शास्त्रज्ञांनी व्यक्त केला. तसेच चित्र आज अनेक शेतात दिसून येत आहे.

शेतकरी गेल्या चार वर्षांपासून अनेक संकटांचा सामना करीत आहेत. या संकटांतून अन्नदाता स्वतःला सावरत आहे. यंदा अतिवृष्टी, संततधार पाऊस, पूर, परतीचा पाऊस आदी संकटांना तोंड दिले. पावसामुळे आलेला मररोग, गोगलगाईचे आक्रमण अशा संकटांचाही मुकाबला केला. पीककाढणीवर असताना परतीच्या पावसाने परत एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिसकावला. तरीही अनेक कष्ट घेऊन शेतकऱ्यांनी पीक वाचविले.

सद्यःस्थितीत कपाशी चांगली होती. त्यामुळे सोयाबीनमध्ये झालेले नुकसान कपाशीतून काही प्रमाणात दूर होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. आता अचानक कपाशीवर ‘अल्टरनेरिया’ या बुरशीजन्य आजाराचा प्रादूर्भाव वाढला. त्यामुळे उत्तम स्थितीत असलेली कपाशी लालसर, पिवळसर दिसत आहे. हा प्रादूर्भाव ठरावीक क्षेत्रात नसून, सर्वदूर दिसून येतो. या प्रादूर्भावामुळे शेतकरी आणखी संकटात सापडले आहेत.

कपाशीचे भाव वाढत असताना आता एका वेच्यातच कापूस गेल्यास या हंगामातील सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता वाढली आहे. विशेष म्हणजे, बुरशीचा प्रादूर्भाव सर्व जिल्ह्यात दिसून येतो. यंदा खरीप हंगामाच्या सुुरुवातीपासून शेतकऱ्यांवर एकामागून एक संकट येत आहे. हंगाम संपताना संकटांची मालिका सुरूच आहे. शेवटच्या टप्प्यात कपाशीवर झालेला प्रादूर्भाव शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘अल्टरनेरिया’चा कपाशीवरील प्रादुर्भाव...

रोगाच्या प्रादुर्भावामुळे कपाशीची पाने गळून पडत आहेत

पानातील कर्बग्रहण करण्याची प्रक्रिया मंदावल्याचा झाडावर परिणाम

पानगळीनंतर नवीन फूल, पाती येण्याची शक्यता फार कमी

कपाशी लालसर, पिवळसर दिसत आहे

‘अल्टरनेरिया’ या बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव अचानकपणे कपाशीवर वाढताना दिसतोय. काही भागांतील निरीक्षण पाहता एका वेच्यातच कापूस संपणार आहे. नवीन फुले, पाती येण्याची शक्यता कमी आहे. बुरशीनाशक फवारणी करून रोगाला रोखणे शक्य आहे.

- डॉ. प्रमोद यादगीरवार, शास्रज्ञ, विभागीय कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT