Tata Airbus
Tata Airbus  Agrowon
ताज्या बातम्या

Tata Airbus : ‘टाटा एअरबस’ गुजरातला गेल्याने आरोप प्रत्यारोप

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

मुंबई : फॉक्सकॉन प्रकल्पानंतर (Foxcon Project) टाटा एअरबस प्रकल्प (Tata Aibus Project) गुजरातमध्ये गेल्यानंतर सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार (Shinde Fadanvis Sarkar) आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच गुजरातमध्ये गेला, असा दावा भाजप आणि शिंदे गटाने केला आहे. तर हे सरकार केंद्र सरकारचे एजंट आहे, असा आरोप केला आहे.

टाटा एअरबस हा प्रकल्प नागपूर किंवा नाशिक येथे प्रस्तावित होता. नागपूर येथे हा प्रकल्प होण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर नाशिकच्या जागेसाठी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आग्रही होते. नाशिक येथे या प्रकल्पासाठी उपयुक्त जागा असल्याचे टाटा समुहाचे म्हणणे आहे. २२ हजार कोटींचा हा प्रकल्प नागपुरात होण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही होते. मात्र, अचानक गुजरातला गेल्याने पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे.

उद्योगांपाठोपाठ मुंबईही गुजरातला देतील’

महाराष्ट्रातील उद्योगधंदे, महत्त्वाच्या संस्था गुजरातला घेऊन जायच्या, मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी करायचे, या ध्येयाने केंद्रातील मोदी सरकार काम करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रकल्प गुजरातला जाणे थांबवले होते. मात्र, शिंदे -फडणवीस सरकारच्या काळात मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र, पालघर येथील प्रस्वातील मरीन अकादमी, मुंबईतील डायमंड बोर्स असे अनेक महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला गेले.

या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मोठ्या उद्योगाबाबत मोदी आणि शहा यांच्याशी मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली आहे. राज्यात भविष्यात मोठे मोठे उद्योग येतील. राज्याची भरभराट होईल. राज्याची समृद्धी होईल. भविष्यात तरुणांच्या हाताला रोजगार मिळवण्यासाठी आमचं सरकार प्रयत्नशील असू.’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT