Grampanchyat Election Agrowon
ताज्या बातम्या

Grampanchyat Election : ग्रामपंचायत निकालानंतर गुलालाची उधळण

वऱ्हाडात ८०० ठिकाणी निकाल जाहीर

Team Agrowon

अकोला ः वऱ्हाडात सुमारे ८०० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी (ता.२०) मतमोजणी झाली. यावेळी विजयानंतर उमेदवारांनी एकच जल्लोष केला. दुपारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मतमोजणीसाठी हजारोंची गर्दी उसळली होती. महाविकास आघाडी व युतीच्या उमेदवारांमध्ये काट्याच्या लढती झाल्या. थेट सरपंचपदाची निवडणूक झाल्याने अकोला जिल्ह्यात भाजप, वंचित आघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार अनेक ठिकाणी विजयी झाल्याचे दावे केले जाऊ लागले आहेत.

अकोला जिल्ह्यात २६५ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. जिल्ह्यातील सात तालुक्यांत ८२ टेबलांवर २७८ कर्मचाऱ्यांच्या मदतीने मतमोजणी करण्यात आली. अकोल्यात शासकीय धान्य गोदाम क्रमांक एक येथे १२ टेबल लावण्यात आले होते.

तेल्हारा येथे तहसील कार्यालय, मूर्तिजापूरमध्ये नवीन शासकीय धान्य गोदाम, बाळापूर येथे धान्य गोदाम, अकोटमध्ये नवीन तहसील कार्यालय, बार्शीटाकळीमध्ये पंचायत समिती सभागृह तर पातूर येथे तहसील कार्यालयात मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली होती.

जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यात २३, अकोट ३६, मूर्तिजापूर ५१, अकोला ५४, बाळापूर २६, बार्शीटाकळी ४७, पातूर २८ अशा एकूण २६५ ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी करण्यात आली.

दावे-प्रतिदावे सुरू

सरपंचपदासाठी थेट निवडणूक झाल्याने यंदा कमालीची चुरस दिसून आली. त्यामुळे ग्रामपंचायतीवर ताबा मिळवण्याचे दावे सुरू झाले. निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांकडून आपला उमेदवार विजयी झाल्याच्या पोस्ट समाज माध्यमात फिरवण्यासाठी एकच लगबग सुरु झाली होती. अकोला जिल्ह्यात भाजप, वंचित बहुजन आघाडीचे सरपंच अधिक प्रमाणात विजयी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. महाविकास आघाडीचेही उमेदवार विजयी झाले आहेत. दुपारनंतर मजमोजणीच्या ठिकाणी कार्यकर्त्यांची एकच गर्दी उसळली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT