Ajit Pawar  Agrowon
ताज्या बातम्या

Ajit Pawar : नाफेडची कांदा खेरदी ताबडतोब सुरू करा; अजित पवार मुख्यमंत्र्यांशी बोलणार

नाशिकमध्ये नाफेडकडून कांद्याची खरेदी बंद झाली आहे. ती पुन्हा सुरु व्हावी, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याशी फोनवर संवाद साधणार आहे.

Team Agrowon

Ajit Pawar On Onion Procurement : राज्य सरकाच्या आश्वासनानंतरही नाफेडकडून कांदा खेरदी (NAFED Onion Procurement) होत नाही. सरकारने बंद झालेली खरेदी केंद्रे ताबडतोब सुरू करावीत, यासाठी आपण स्वत: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याशी संवाद साधणार असल्याचे राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार (jit Pawar) यांनी सांगितले. ते नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यात लेट खरीप कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याच मुद्यावरून विरोधीपक्षांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही कांद्याचा प्रश्न लावून धरला होता.

यावेळी राज्य सरकारने नाफेडमार्फत कांदा खरेदी केली, जाईल असे सांगितले होते. परंतु राज्यातील कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या नाशिकमध्ये नाफेडची कांदा खरेदी बंद असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी पवार यांच्याकडे केली.

यावेळी पवार म्हणाले की, नाशिकमध्ये नाफेडकडून कांद्याची खरेदी बंद झाली आहे. ती पुन्हा सुरु व्हावी, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याशी फोनवर संवाद साधणार आहे. कांदा उत्पादनाचे प्रमुख्य केंद्र म्हणून नाशिकचे ओळख आहे. त्यामुळे सरकारने बंद झालेली कांदा खरेदी केंद्रे तातडीने सुरु करावीत, असेही ते म्हणाले.

तसेच राज्य सरकार कांदा उत्पादकांना प्रतिक्विटल ५०० रुपये अनुदान देईल, अशी अपेक्षा होती. मात्र, राज्य सरकारने केवळ ३५० रुपये अनुदानाची घोषणा केली. विरोधीपक्ष म्हणून आम्ही याबाबात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अनुदान वाढवून देण्याची मागणीही केल्याचे ते म्हणाले.

शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही

अवकाळी पावासामुळे द्राक्ष, कांदा, केळी, संत्रा फळबागां उत्पादकांचे नुकसान झाले आहे. सुरूवातीच्या काळात राज्य सरकारी कर्मचारी संपावर असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. ही बाब मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली.

अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्याला मदत करण्यासाठी सरकारडे राजकीय इच्छाशक्ती हवी, असेही पवार म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dharashiv Farmer Story: सरकारच्या ५ हजारांच्या अग्रिम मदतीवरुन नाराजी, शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना सोयाबीनची 'पट्टी'च केली मनी ऑर्डर

Integrated Farming: एकात्मिक शेती दुष्काळात फायदेशीर ठरेल : कुलगुरू खर्चे

Agriculture Irrigation Challenges: मोटारपंप बंदीच्या निर्देशांमुळे नवे संकट : किशोर वडेट्टीवार

Farmers Issue: कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हाती भोपळा : खासदार अमर काळे

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांची चेष्टा होणार नाही, 'एनडीआरएफ'कडूनही मदत मिळेल- बावनकुळे

SCROLL FOR NEXT