Ajit Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Ajit Pawar : "दुधाच्या धंद्यामुळे माझं बस्तान बसलं" - अजित पवार

"मी पण दुधाच्या धंद्यातून पुढे आलेला कार्यकर्ताय" असे म्हणत राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी राजकारणात येण्याआधी त्यांनी केलेल्या मेहनतीचे किस्से सांगितले.

Team Agrowon

Ajit Pawar News "मी पण दुधाच्या धंद्यातून पुढे आलेला कार्यकर्ताय" असे म्हणत राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजकारणात येण्याआधी त्यांनी केलेल्या मेहनतीचे किस्से सांगितले.

आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि तत्त्काळ निर्णय घेण्यासाठी परिचित असलेल्या अजित पवारांची ही दुसरी बाजू आज बारामतीकरांनी अनुभवली. बारामतीमधील आप्पासाहेब पवार उद्योग भवनाच्या उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. (Latest Marathi News)

पवार म्हणाले की, मी पण दुधाच्या धंद्यातून पुढं आलेला कार्यकर्ता आहे. वडिल वारल्यानंतर डेअरीमुळे खऱ्या अर्थानं माझं बस्तान बसलं. मी सांगितलं तर पटणार नाही, त्यावेळी जमिनीच्या किमती इतक्या कमी होत्या की, एक गाय विकून एक एकर जमीन घ्यायचो.

त्याकाळात जमीनीचे दर कमी होते आणि बाकी गोष्टींसंदर्भात एक वेगळं कुतूहल असायचं. असा मजेशीर किस्सा त्यांनी सांगितला.

बारामती आणि परिसरात आधिपासूनच शेती आणि डेअरी व्यवसाय मोठ्या प्रमाणात होता. त्यावेळी इंदापूरच्या आकोबा शिंदे या शेतकऱ्याने गायींसाठी पंखे लावले होते. बारामतीतही काही मोठे शेतकरी डेअरीच्या व्यवसायात होते. शेवटी कष्ट घेतलं तर यश मिळतं, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

पवार पुढे म्हणाले, आताच्या गायींना योग्य पोषण आहार मिळतो. त्यामुळे या गायींचं शेणही मोठ्या प्रमाणात मिळतं. गायींच्या आहारवर या शेतकऱ्यांचा अभ्यास झाला आहे. दिवसांतून १२ तासांच्या अंतरानं गायी म्हशीचं दूध काढलं जातं. त्यामुळे त्यांचं आरोग्यही चांगलं राहतं.

दरम्यान, आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी अजित पवार हे बारामतीमधील विकास कामांचा आढाव घेत असतात. राज्यात संत्तांतर झाल्यानंतर विकासाचा वेग कमी होईल असे वाटत होते.

परंतु आम्ही सत्तेत असतो तेव्हा विकास कामांमध्ये राजकारण आणत नाही. त्यामुळे सत्ता नसतानाही आपली कामे अडत नसल्याचे पवार यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT