Barrage Agrowon
ताज्या बातम्या

Vanrai Barrage : कृषी विभाग, शेतकऱ्यांच्या श्रमदानातून टाकळीत बंधारा

टाकळी (ता. तळोदा) येथे तळोदा कृषी विभाग व ‘आत्मा’ (तळोदा) मार्फत आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘किसान गप्पा-गोष्टी’ कार्यक्रम झाला.

Team Agrowon

तळोदा, जि. नंदुरबार ः टाकळी (ता. तळोदा) येथे तळोदा कृषी विभाग (Department of Agriculture) व ‘आत्मा’ (तळोदा) मार्फत आंबा उत्पादक (Mango Growers) शेतकऱ्यांसाठी ‘किसान गप्पा-गोष्टी’ कार्यक्रम झाला. या वेळी आंब्यापासून प्रक्रिया उद्योगाबाबत व शासनाच्या विविध योजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तळोदा कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व उपस्थित शेतकरी यांनी श्रमदानातून टाकळी येथे वनराई बंधारादेखील बांधला.

नंदुरबार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. यू. बी. होले, सहायक प्राध्यापक डॉ. महेश भारती, मंडळ कृषी अधिकारी रवींद्र मंचरे, कृषी पर्यवेक्षक जगदीश शिरसाट, चंद्रप्रकाश पावरा, कृषी सहायक शिलदार पावरा, दीपक पावरा, रामदास पावरा, सचिन पाडवी, आर. ए. पवार, सायसिंग पाडवी व आत्माचे विपुल चौधरी उपस्थित होते. या वेळी आंबा लागवड यशस्वीपणे करणाऱ्या रतिलाल पावरा व स्वरूपसिंग पावरा यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी डॉ. यू. बी. होले यांनी आंबा पीकलागवड व त्याच्यावर येणाऱ्या किडींचे नियंत्रण जैविक पद्धतीने कसे करावे, या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. महेश भारती यांनी आब्यापासून प्रक्रिया करून घेण्यात येणारे विविध प्रक्रिया उद्योगांबाबत माहिती दिली. रवींद्र मंचरे यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच फळबाग लागवडीसाठी मनरेगा व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेबाबत माहिती दिली व पीएमएफएमई योजनेमार्फत आमचूर व आंबा कँडीबाबत माहिती दिली.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले. रतिलाल पावरा यांनी आंबा लागवड करताना आलेल्या अडचणी व त्यावर केलेल्या उपाययोजना याबाबतचे अनुभव शेतकऱ्यांना सांगितले. शिलदार पावरा यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विपुल चौधरी, तळोदा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे सर्व कृषी सहायकांचे सहकार्य लाभले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT