Department Of Agriculture
Department Of Agriculture Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Department : डॉ. मोतेंकडून आस्थापनाचे कामकाज काढून घेतले

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune : फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांच्याकडून आस्थापना विभागाच्या संनियंत्रणाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. मंत्रालयातून आलेल्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

कृषी आयुक्तालयात निविष्ठा व गुणनियंत्रण विभागासारखा आस्थापना विभाग ‘मलईदार’ समजला जातो. नोकरी भरती, बढत्या, बदल्या, खातेनिहाय चौकशा, नोटिसा बजावणे तसेच निलंबन आणि बडतर्फी अशा सर्व प्रक्रियांमध्ये आस्थापना विभागाची भूमिका महत्त्वाची असते.

कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे आस्थापना विभागाने आपला सवता सुभा शाबूत ठेवला आहे. कारण आयुक्तांशिवाय या विभागावर कोणाचेही नियंत्रण नाही.

“आस्थापना विभागाला संचालक किंवा इतर वरिष्ठ नियंत्रक नाहीत. तेथे सहसंचालकाचे एक पद असून, ते वर्षानुवर्षे सुधीर ननावरे यांच्या ताब्यात आहे.

त्यामुळे वर्षानुवर्षे आस्थापनाची चावी एकाच अधिकाऱ्याच्या ताब्यात ठेवण्यात आली आहे. या विभागात अनेक भानगडी असल्याचे लक्षात आल्यानंतर तत्कालीन कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी पावले टाकली होती. त्यांनी या विभागाची संनियंत्रणाची जबाबदारी डॉ. मोते यांच्याकडे दिली होती.

आता मात्र ननावरे यांना पुन्हा मोकळीक दिली आहे. नव्या निर्णयानुसार, आस्थापनाच्या कामकाजाची फाइल आता डॉ. मोते यांच्या मान्यतेसाठी न पाठवता ननावरे यांच्याकडूनच कृषी आयुक्तांसमोर ठेवली जात आहे,” असे आस्थापना विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

एका जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आस्थापना विभागात अजिबात पारदर्शकता राहिलेली नाही. मागील कृषी सेवक भरतीमधील गैरव्यवहाराबाबत सत्य बाहेर येऊ दिलेले नाही. बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला.

मात्र कोणालाही अटक केली नाही. ननावरे यांची हा विभाग वगळता इतरत्र बदली केली जात नाही. मुळात आस्थापना विभागाच्या संनियंत्रणासाठी मधल्या फळीत आणखी एक संचालक देण्याची गरज आहे. परंतु आस्थापना विभागाला कोणताही मध्यस्थ नको आहे.

गैरव्यवहाराच्या चौकशा दाबून ठेवण्यासाठी या विभागात सोयीचे निर्णय घेतले जातात. मुळात, आयुक्त व आस्थापना सहसंचालक हे दोघेही संवर्ग कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांमधून भरले जात नाहीत. त्यामुळे कृषी खात्याची आस्थापनाविषयक घडी नेहमीच विस्कळीत ठेवली गेली आहे.

कृषिमंत्र्यांचे लेखी आदेश
आस्थापनाचे कामकाज डॉ. कैलास मोते यांच्याकडून काढून घ्यावेत, असे लेखी आदेश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मात्र मोते यांचा हा विषय कोणत्या अधिकाऱ्याने सत्तार यांच्यासमोर मांडला हे स्पष्ट झालेले नाही. मोते यांचा अडसर दूर झाल्यामुळे आस्थापना विभागात मात्र जल्लोष केला गेला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT