Tomato Agrowon
ताज्या बातम्या

Tomato Cultivation : टोमॅटो लागवडीबाबत ७ जिल्ह्यांमधून अहवाल मागवले

Tomato Rates : कृषी आयुक्तांनी घेतला आढावा

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Tomato Latest Update: पुणे ः राज्यातील टोमॅटोची लागवड आणि उत्पादनविषयक सात जिल्ह्यांमधून वस्तुस्थितिदर्शक अहवाल मागविण्याचा निर्णय कृषी आयुक्तालयात झालेल्या एका बैठकीत घेण्यात आला आहे.
टोमॅटोचे उत्पादन घटल्यामुळे देशभर पुरवठा मंदावला आहे. त्यामुळे दरात झालेली वाढ चर्चेचा विषय ठरली आहे. कांद्याप्रमाणेच टोमॅटोदेखील राजकीय मुद्दा होऊ पाहत आहे. देशातील प्रमुख टोमॅटो उत्पादन राज्यात महाराष्ट्राचा समावेश होतो. या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने देखील उत्पादन व पुरवठा स्थिती जाणून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच कृषी आयुक्तालयात दोन वेळा टोमॅटोविषयावर बैठका झाल्या. यात कृषी विद्यापीठांचे प्रतिनिधी व कृषी अधिकारी सहभागी झाले होते. नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नागपूर या जिल्ह्यांमधील टोमॅटोच्या स्थितीची माहिती घ्यावी व नव्या लागवडीबाबत सविस्तर अहवाल पाठवावेत, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. कृषी अधिकाऱ्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतरच राज्यातील टोमॅटोची लागवड, उत्पादन व भावपातळीची वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे आयुक्तालयाचे म्हणणे आहे.

राज्यात ५७ हजार हेक्टरवर टोमॅटो लागवड होते. त्यापैकी खरिपात ४२ हजार, तर रब्बी व उन्हाळी हंगामांत १६-१७ हजार हेक्टरवर लागवड केली जाते. त्यापासून अंदाजे १० लाख टन टोमॅटोचे उत्पादन होते. सध्या टोमॅटोचे भाव चढे असले, तरी यापूर्वी डिसेंबर २०२२ ते मे २०२३ या कालावधीत टोमॅटोला अतिशय कमी दर मिळाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

राज्यात यापूर्वी टोमॅटो शेतीत शेतकऱ्यांवर वारंवार नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यामुळेच लागवड कमी झाली. याशिवाय मार्च ते मे या कालावधीत राज्यात अवकाळी पाऊस झाले. त्यातून टोमॅटो शेतीचे नुकसान झाले. मॉन्सूनचे आगमन राज्यात उशिरा झाले व आतापर्यंत पाऊसदेखील सरासरीच्या केवळ ५४ टक्के झाला आहे. याचा परिणाम टोमॅटोच्या नव्या लागवडीवर झाला, असे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pimpalgaon Baswant APMC: पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटो खरेदीतील दरतफावतीला लगाम

Rain Deficit : नऊ महसूल मंडलांत २१ दिवसांचा पावसाचा खंड

Agricultural Drought : शेतशिवाराला दुष्काळाच्या झळा

Maharashtra Agriculture : परभणी जिल्ह्यात शुक्रवारपासून केवळ ‘एफएफएस’ ॲपद्वारे खत विक्री

Pashudhan Bima Yojana : पशुधन विमा योजना ऑनलाइन अर्ज सुरू

SCROLL FOR NEXT