Agriculture Research  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Research : कृषी संशोधनास संवादातून मिळू शकेल दिशा ः डॉ. मणी

कृषी विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक, विद्यार्थी यांच्यात सातत्‍याने विचारांची देवाण-घेवाण झाली तर संशोधनास दिशा मिळेल.

टीम ॲग्रोवन

परभणी ः ‘‘कृषी विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक, विद्यार्थी यांच्यात सातत्‍याने विचारांची देवाण-घेवाण झाली तर संशोधनास (Agriculture Research) दिशा मिळेल. त्याअनुषंगाने परभणी कृषी विद्यापीठाकडून (Agriculture University) देश-विदेशांतील विविध नामांकित संस्‍थांशी सामंजस्‍य करार करुण विविध विषयांत शास्‍त्रज्ञ, विद्यार्थ्यांतील कौशल्‍य विकासावर भर दिला जात आहे. दुसऱ्या बाजूने विद्यापीठ शास्‍त्रज्ञ शेतकऱ्यांशी जास्‍त संवाद साधत आहेत,’’ असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी (Dr. Indra Mani) यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापकांशी अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील कृषी आणि जीवशास्‍त्रीय अभियांत्रिकीचे शास्‍त्रज्ञ वरिष्ठ प्राध्‍यापक डॉ. धर्मेंद्र सारस्‍वत यांनी नुकताच संवाद साधला. या वेळी अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू डॉ. इंद्र मणी होते.

आयआयटी मुंबईचे प्रा. ईश्‍वर राजशेखर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य (कृषी महाविद्यालय) डॉ. सय्यद इस्माईल, प्राचार्य (कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय) डॉ. उदय खोडके, प्राचार्य (अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालय) डॉ. राजेश्‍वर क्षीरसागर, डॉ. सचिन मोरे आदींची उपस्थिती होती. डॉ. सारस्‍वत म्‍हणाले, की अनेक भारतीय शास्‍त्रज्ञ विदेशात कृषी संशोधनात योगदान देत आहेत. भारतीय शेती पुढे अनेक आव्‍हाने आहेत. असे ही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maize Varieties: एल निनोच्या परिस्थितीशी सामना करु शकणारे मक्याचे वाण

Farmer Issues: सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी : हर्षवर्धन सपकाळ

Yeola Rain Damage: येवल्यात वादळी वाऱ्यासह पावसाने दाणादाण

Nashik Onion Farmer Crisis: कांद्याला कवडीमोल भाव, नाशिकमधील शेतकऱ्याचा बळी घेतला, राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया

Illegal Tree Cutting: सातारा- लोणंद मार्गावर बेकायदा वृक्षतोड अन् वाहतूक

SCROLL FOR NEXT