Organic Farming Agrowon
ताज्या बातम्या

Organic Inputs Price Chart : जैविक निविष्ठा पुरवठ्याचे दरपत्रक ‘कृषिउद्योग’कडून जाहीर

Pune News : चार प्रकारच्या अॅझाडिरेक्टिनचा पुरवठा होणार

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Agriculture Organic Inputs :
राज्यातील शेतकऱ्यांना निविष्ठा (Inputs) पुरवण्यासाठी जोरदार तयारी करणाऱ्या महाराष्ट कृषिउद्योग विकास महामंडळाने कृषी खात्याला दरपत्रक (Price Chart) कळविले आहे.

याबाबत कृषी आयुक्तालय काय निर्णय घेते, याकडे राज्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे (एसएओ) लक्ष लागून आहे.

महामंडळाच्या कीटकनाशके व प्रशासन विभागाच्या उपमहाव्यवस्थापिका ज्योती देवरे यांनी कृषी आयुक्तालयाला पाठवलेल्या पत्रात १० प्रकारच्या निविष्ठा पुरवण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे.

त्यासाठी दरपत्रक तयार करण्यात आले असून त्यात ५० हजार ‘पीपीएम’च्या अॅझाडिरेक्टिनचा १०० मिलिलिटरचा दर १०९७ रुपये तर ५० हजार ‘पीपीएम’साठी २७१९ रुपये निश्चित केला आहे.

अॅझाडिरेक्टिनचा पुरवठा होण्यासाठी काही कृषी सहसंचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विशेष प्रयत्न करीत आहेत. “महामंडळाचे दरपत्रक राज्यातील सर्व कृषी सहसंचालक व एसएओंना कळवावे.

दरपत्रकातील निविष्ठा महाराष्ट्र इनसेक्टिसाईडस् लिमिटेड (अकोला) यांच्यामार्फत उत्पादित केली गेली आहे. पुरवठा प्रक्रियेत जैविक कीटकनाशके, कामगंध सापळे व सूक्ष्ममुलद्रव्यांचा समावेश करावा,” असाही आग्रह या पत्रात धरण्यात आला आहे.

राज्याच्या कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना निविष्ठा पुरवण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात.

या योजनांमध्ये कृषिउद्योग महामंडळाची जैविक कीटकनाशके महानीम, कृषिउद्योग सूक्ष्ममुलद्रव्ये ग्रेड २ व जैविक कामगंध सापळ्यांचा समावेश करावा, असे महामंडळाने कृषी खात्याला सुचविले आहे.

कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले की, महामंडळाकडून निविष्ठा पुरवठ्याचे दरपत्रक आले आहे. परंतु, त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. खरीप हंगाम जवळ आल्यामुळे शेतकऱ्यांना निविष्ठांची आवश्यकता आहे. मुदतीत पुरवठा न झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते.

महामंडळाच्या निविष्ठांच्या गुणवत्तेवर सतत प्रश्नचिन्ह लावले जाते. त्यामुळे महामंडळाऐवजी शेतकऱ्यांना खुल्या बाजारातून निविष्ठा खरेदी करू द्याव्यात व खरेदीपोटी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात अनुदान रक्कम थेट जमा करावी, असे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले.

मात्र, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी महामंडळामार्फत निविष्ठा खरेदी करणे योग्य राहील, असा महामंडळाचा दावा आहे.

जैविक निविष्ठा पुरवठ्याचे दरपत्रक
- ५० हजार पीपीएमचे अॅझाडिरेक्टिन १०० मिलीलिटरचा दर ः १०९७ रुपये, २५० मिलिलिटरचा दर २७१९ रुपये
-३ हजार पीपीएमचे अॅझाडिरेक्टिन १०० मिलिलिटरचा दर ः २४९ रुपये, २५० मिलिलिटरचा दर ५२८ रुपये, ५०० मिलिलिटरचा दर १०९८ रुपये


-१५०० हजार पीपीएमचे अॅझाडिरेक्टिन १०० मिलिलिटरचा दर ः १७० रुपये, २५० मिलिलिटरचा दर ४९८ रुपये, ५०० मिलिलिटरचा दर ९०८ रुपये.
-सूक्ष्ममुलद्रव्ये ग्रेड २ ः एक लिटर ३३० रुपये


-कामगंध सापळे ः एक नग ४८ रुपये
-चिकट सापळे ः एक नग ३४ रुपये
-हेलिओथिस ल्युअर्स ः एक नग २५ रुपये


-स्पोडोप्टेरा ल्युअर्स ः एक नग २८ रुपये
-स्क्रिपोफागा ल्युअर्स ः एक नग २८ रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biochar Production: कर्ब संवर्धनासाठी पीक अवशेषांपासून बायोचार निर्मिती

Turmeric Farming: हळद, आले पिकांतील अन्नद्रव्ये व्यवस्थापन 

Armyworm in Maize: मक्यातील लष्करी अळीचा करा नायनाट; कीड व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती

Great Indian Bustard: माळढोक अभयारण्याच्या राखीव क्षेत्रात सोडले घातक रसायन 

Lumpy Disease: मोहोळमध्ये ‘लम्पी स्कीन’ने दोन जनावरांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT