SIILC
SIILC Agrowon
ताज्या बातम्या

Agri Business Management : कृषी क्षेत्रात करिअरला उत्तम पर्याय ‘ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’

टीम ॲग्रोवन

पुणे ः कृषी क्षेत्र अर्थात ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये (Agriculture Sector) विविध व्यवसाय करण्याला, चांगल्या पगाराच्या नोकरी मिळवायला मुबलक संधी उपलब्ध आहेत. परंतु असे कोणते व्यवसाय आहेत, ते कसे सुरू करायचे (स्टार्ट अप), (Start Up) त्यासाठी काय कौशल्य (स्किल्स), ज्ञान (नॉलेज) आवश्यक असते,

रोजगार अर्थात नोकरीच्या कोणकोणत्या संधी कुठे उपलब्ध आहेत, त्यासाठी स्वतःला कसे अपग्रेड केले पाहिजे, इंजिनिअरिंग, बीए, बीकॉम, बीबीए वा ॲग्री सोडून इतर क्षेत्रातील पदवीधरांनाही कृषी क्षेत्रात यशस्वीपणे बिझनेस कसा करता येईल,

चांगल्या पॅकेजची नोकरी कशी मिळेल, कुठला अभ्यासक्रम निवडला पाहिजे जेणेकरून करिअर चांगले घडेल इ. विविध प्रश्न मनात भेडसावणाऱ्या पदवीधारक (२१ ते २५ वयोगटातील) तरुणांना कृषी क्षेत्रात करिअर करण्यासाठी ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट हा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम एकमेव पर्याय ठरत असून आजवर अनेक तरूणांच्या करिअरचा दिशादर्शक ठरला आहे.

कोणत्याही पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याचा (मास्टर डिग्री वा एमबीए) वा एमपीएससी, यूपीएससी परिक्षेची तयारी करून स्वतःचे नशीब आजमावयाचा पर्याय अनेक तरूणांच्या समोर असतो. त्यातील अनेकांना सीईटी देऊन एमबीएला तर अनेकांना मास्टर डिग्री अर्थात पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो.

तर उर्वरित अनेकजण क्लास वन– क्लास टू होण्याच्या उद्देशाने तयारीला लागतात. मात्र ज्यांना कुठेही प्रवेश मिळत नाही ते करिअरबाबत विवंचनेत दिसतात. अशा तरूणांसमोर आजही ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रमाचा पर्याय खुला आहे, आणि याचे प्रवेश चालू आहेत.

या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा नामांकित इंडस्ट्रींनी डिझाईन केलेला अभ्यासक्रम आहे. यात स्वतः इंडस्ट्रींचे तज्ज्ञ विद्यार्थ्यांना इंडस्ट्री कशी चालते, त्यातील अडचणींवर मात कशी करावी, स्पर्धेच्या युगात टिकून कसे राहावे, मनुष्यबळ कसे हाताळावे, सप्लाय चेनचे मॅनेजमेंट कसे करावे, यशस्वी उद्योजक कसे बनावे,

आउट ऑफ बॉक्स जाऊन डिझाईन थिंकिंग कसे करावे, स्वतःमध्ये उद्योजकता कौशल्य कसे विकसित करावे, नोकरीतही वरच्या पदावर जाण्यासाठी कसा दृष्टिकोन हवा, व्यवसाय कसा वाढवावा, अन्नप्रक्रिया, दुग्धव्यवसाय, निर्यात व्यवसायातील संधी इ.विषयांवर सखोल मार्गदर्शन करतात.

या अभ्यासक्रमाचा विशेष म्हणजे विद्यार्थी ६ महिने इंडस्ट्रीत इंटर्नशिप करण्यासाठी गेल्यावर त्यांनी कंपनीसाठी आपल्या शिक्षणातून काहीतरी मोलाचे योगदान द्यावे असा प्रयत्न केला जातो. ज्यामुळे कंपनीला देखील फायदा होईल आणि विद्यार्थ्यांनाही आपला चांगला परफॉर्मन्स दिल्यामुळे त्याच कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी मदत होईल.

या संकल्पनेमुळे (लर्न ॲन्ड कॉन्ट्रीब्युट इनिशिएटिव्ह) विद्यार्थ्यांना उत्तम प्लेसमेंट देण्याचे या अभ्यासक्रमाचे १०० टक्के रेकॉर्ड आहे. करिअरला दिशा देण्यासाठी हा अभ्यासक्रम निश्चितच फायदेशीर ठरेल यात शंका नाही.

अधिक माहितीसाठी संपर्क ः ९८८१०९९४२६

अभ्यासक्रमाविषयी थोडक्यातः

अभ्यासक्रमाचे नाव ः पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट

कालावधी ः १ वर्ष पूर्णवेळ

सुरुवात ः १७ ऑक्टोबर २०२२

कुठे ः सकाळ व ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था, एसआयआयएलसी, पुणे

पत्ता ः सकाळनगर, बाणेर रोड, औंध, पुणे

प्रवेश कुणासाठी ः कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर

वयोमर्यादा ः फक्त २१ ते २५ वयोगटातील विद्यार्थी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT