Swabhimani Shetkari Sanghtana Agrowon
ताज्या बातम्या

Swabhimani Shetkari Sanghtana : हरभरा खरेदीसाठी ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

जिल्ह्यात हरभरा काढणीला एक महिन्यापासून सुरुवात झाली आहे. खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केली जात आहे.

Team Agrowon

Parbhani Farmer Protest : शासनाने तत्काळ हमीभावाने हरभरा खरेदी सुरू करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मंगळवारी (ता. २८) परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हरभरे फेकण्यात आले.

जिल्ह्यात हरभरा काढणीला एक महिन्यापासून सुरुवात झाली आहे. खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केली जात आहे.

शासकीय खरेदी केंद्रावर अद्याप शेतकरी नोंदणी सुरू नाही. १५ मार्चपासून हरभरा खरेदीस सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने खुल्या बाजारात प्रतिक्विंटल ४ हजार ते ४२०० रुपये एवढ्या कमी दराने हरभरा विकावा लागत आहे.

'हमीभावापेक्षा कमी भावामुळे शेतकऱ्यांचे क्विंटलमागे १००० रुपयांचे नुकासन होत आहे. त्यामुळे शासकीय हरभरा खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावीत; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामप्रसाद गमे, मुंजाभाऊ लोडे, भास्कर खटिंग, केशव आरमळ, प्रसाद गरुड, रामभाऊ अवरगंड, बाळासाहेब घाटोळ, विजय कोल्हे, माऊली लोडे, अंकुश शिंदे, हनुमान शिंदे, कृष्णा शिंदे, अर्जुन बागल आदींनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT