Agri Student Protest Agrowon
ताज्या बातम्या

Agri Student Protest : कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आंदोलन सहाव्या दिवशीही सुरू

महाराष्ट्र राज्य कृषी अभियांत्रिकी संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी या चारही कृषी विद्यापीठांच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर विद्यार्थ्यांनी २५ जानेवारीपासून ठिय्या धरणे आंदोलन सुरू केले आहे.

Team Agrowon

नगर ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२१-२०२२ ला तत्काळ स्थगिती देऊन अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे करावे. स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करावे.

मृदा व जलसंधारण विभागांमध्ये कृषी अभियांत्रिकी शाखेच्या उमेदवारांची भरती करावी यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत (Agriculture Univercity) कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन (Agri Student Protest) सोमवारी (ता. ३०) सुरू आहे.

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात जवळपास साठ विद्यार्थी आजारी पडल्याने त्यांना रूग्णालयात हलवले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२१-२०२२ ला तत्काळ स्थगिती देऊन अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे करावे.

यासह इतर मागण्यासाठी शासकीय व खासगी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे, उत्तीर्ण झालेले व पीएचडी करणारे हजारो विद्यार्थी ठिय्या आंदोलन करत आहेत. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत आंदोलन सुरूच आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी अभियांत्रिकी संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी या चारही कृषी विद्यापीठांच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर विद्यार्थ्यांनी २५ जानेवारीपासून ठिय्या धरणे आंदोलन सुरू केले आहे.

शासकीय व खासगी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे, उत्तीर्ण झालेले व पीएचडी करणारे हजारो विद्यार्थी आंदोलनात उतरले आहेत.

राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारती समोर चारशे विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने पाचव्या दिवशीही आंदोलन सुरू आहे.

सध्या थंडीचे दिवस आहे. गार वाराही सुरू आहे, त्याचा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना त्रास होत असून राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात आंदोलन करणाऱ्या ६० च्या जवळपास विद्यार्थ्यांना आजारी पडलेल्या रुग्णालयात हलवले आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार नीलेश लंके, डॉ. सुधीर तांबे, प्राजक्त तनपुरे, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, सत्यजित तांबे, अधिसभा सदस्य संजीव भोर यांनी भेट देऊन पाठिंबा देत मागण्या मान्य करण्याची सरकारला विनंती केली आहे.

अण्णा हजारे यांची भेट

कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सहा दिवस होऊनही शासनाकडून फारशी दखल घेतली गेली नाही. विद्यार्थ्यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगण सिद्धी (ता. पारनेर) येथे जाऊन भेट घेत मागण्याचे निवेदन दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Devendra Fadnavis On Ajit Pawar: 'मित्रशोक आपल्या अंतस्थ आत्म्यालाही जाळतो', अजितदादांच्या आठवणींनी मुख्यमंत्री फडणवीस भावूक

Agriculture Advisory: ढगाळ हवामान; किमान, कमाल तापमानात वाढ शक्य

Carbon Farming: कार्बन शेती : शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा मार्ग

Sugarcane Workers: मजुरांचे तांडे परतीच्या वाटेवर; शिवार पुन्हा गजबजणार

Maharashtra Unseasonal Rain: विदर्भ, मराठवाडा, कोकणला अवकाळीचा तडाखा, गहू, हरभरा पिकाचे नुकसान

SCROLL FOR NEXT