Vijay Vadettiwar Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Loan : शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठविल्यास रस्त्यावर उतरू

Vijay Wadettiwar : राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांत पिके करपू लागली आहेत.

Team Agrowon

Mumbai News : राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांत पिके करपू लागली आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये पूर्ण पेरणी झालेली नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज वसुलीकरिता नोटिसा बजावण्यात येत आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना पाठविण्यात येणारी बँकांची नोटीस तत्काळ थांबवून कर्जमाफी करावी, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दिला आहे.

वडेट्टीवार म्हणाले, की १ ते १८ ऑगस्ट दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ८० टक्क्यांनी कमी आहे. शेतकऱ्यांची पिके हातातून गेली आहेत.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज भरण्यासाठी नोटीस पाठवण्यात येत आहे. शेतकरी, शेतमजूर यांच्याप्रती शिंदे-फडणवीस सरकार बोथट, भावनाशून्य झाले आहे. पीकविमा कंपन्यांनी त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. खतांचा काळाबाजार झाला आहे, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली.

‘...आणि मुख्यमंत्री शेतकरीप्रश्‍नी बोलत नाहीत’

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘‘उपमुख्यमंत्री सूटबूट घालून जपानला जातात आणि मुख्यमंत्री शेतकरीप्रश्‍नी बोलत नाहीत, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना वाली कोण आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटिसा येत आहेत. दुबार पेरणीसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत.

त्यांना शिंदे-फडणवीस सरकारचा एवढा जाच का, जे अजित पवार आजपर्यंत नोटीस आल्यानंतर भूमिका मांडत होते तेही आता काहीच बोलत नाहीत. सरकारने झोपेचे सोंग घेतले असेल तर त्यांना जागे करू. शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या तर रस्त्यावर उतरू,’’ असा इशारा त्यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT