Maharashtra Border Area Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Border : कर्नाटकच्या दाव्यानंतर ‘तुबची’चे पाणी महाराष्ट्रात

कर्नाटक व महाराष्ट्र सीमा भागात ४२ गावांच्या दाव्यावरून वातावरण चांगलेच तापलेले आहे.

Team Agrowon

सांगली : कर्नाटक व महाराष्ट्र सीमा भागात (Maharashtra Border Area) ४२ गावांच्या दाव्यावरून वातावरण चांगलेच तापलेले आहे; मात्र, या तापलेल्या वातावरणात कर्नाटकाकडून तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी (Water) सोडण्यात आले असून महाराष्ट्रातील तिकोंडी तलाव एकाच दिवसात ओहरफ्लो झाला आहे. शिवाय, दाव्याप्रमाणे कर्नाटक नैसर्गिकरीत्या या वंचित गावाला न्याय देऊ शकतो, असे भासविण्याचा प्रयत्न आहे का, अशी चर्चा रंगली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि माजी जलसंपदामंत्री एम. बी. पाटील यांनी जतच्या ४२ गावांवर दावा करून महाराष्ट्रात एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर जत तालुक्यात प्रचंड संताप व्यक्त होतानाच पूर्व भागाला पाण्यापासून वंचित ठेवल्याने राज्य सरकारवरदेखील नाराजी व्यक्त होत आहे.

राज्य सरकार एकीकडे म्हैसाळ विस्तारित योजना पूर्ण करण्यासाठी तातडीने निर्णय घेत आहे. तर याच वेळी कर्नाटकने जतच्या लोकभावनेला हात घालत थेट तुबची योजना सुरू करून जत तालुक्यात नैसर्गिक प्रवाहातून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा ग्रामस्थांशी संवाद

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी तिकोंडी भागाचा दौरा करत, कर्नाटकातून नैसर्गिक प्रवाहातून पाणी येऊ शकते का, याचीदेखील पाहणी केली. या वेळी तिकोंडी, भिवर्गी, हळ्ळी, करजगी, बालगाव, कोंतेवबोबलाद, जालिहाळ बुद्रुक, गिरगाव, करेवाडी (तिकोंडी), रस्त्याक पांडोझरी, कागणरी, आसंगी तुर्कसह भागातील ग्रामस्थांशी दीड ट्रॉलीवर तासभर संवाद साधला. लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांकडून स्थितीसंदर्भात मते ऐकून घेतली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizers Crisis: खतबाजारात खदखद

Strait of Hormuz Crisis: ‘होर्मूझ’मधील पाणसुरुंग हटविण्यास सहा महिने लागण्याची शक्यता

BT Cotton Seed Price: बीटी कापूस बियाण्यांचे दर राहणार ‘जैसे थे’

Maharashtra Weather Forecast: उन्हाचा चटका वाढणार; पावसाचीही शक्यता

Raghav Chadha: 'ऑपरेशन लोटस'! 'आप'मध्ये उभी फूट; राघव चड्ढांसह ३ खासदारांच्या हाती कमळ, १० पैकी ७ खासदार 'भाजप'मध्ये विलीन?

SCROLL FOR NEXT