Adulterated Milk Products Agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur Milk Adulteration : कोल्हापुरात भेसळयुक्त दूध पदार्थांचा महापूर, अन्न औषध प्रशासनाचे दुर्लक्ष

Adulterated Milk Products in Kolhapur : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या गणेशवाडी परिसरात भेसळयुक्त चक्का तयार होत आहे.

Team Agrowon

Kolhapur Shirol News : कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या गणेशवाडी परिसरात भेसळयुक्त चक्का तयार होत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या ठिकाणी चक्का माफियांनी मोठा अड्डाच केल्याने भेसळ चक्का पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात जात असल्याचे बोलले जात आहे.

मलई चक्क्याच्या नावाखाली भेसळ चक्का सर्रास विक्रीसाठी बाहेर पाठविण्यात येत आहे. याकडे कोल्हापूर अन्न औषध प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात. त्यामध्ये मलई चक्का, तूप, श्रीखंड, आम्रखंड बनवले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ज्यादा पैशाच्या हव्यासापोटी भेसळयुक्त दूध पदार्थ आणि सर्वात जास्त चक्का निर्मिती होत आहे.

मलई चक्का बाजूला करून लो फॅटमधून भेसळ चक्का तयार करून विक्रीसाठी कोल्हापूर, पुणे, मुंबई याठिकाणी पाठवला जातो. कर्नाटकातील माफियांचा यामध्ये सहभाग आहे. या भेसळमध्ये अनेक अधिकारी, लोकप्रतिनिधींचा सहभाग असल्याचीही चर्चा आहे.

यामुळे अद्याप कोणतीच कारवाई झाली नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत अन्न औषध प्रशासनाने अद्याप कारवाई का केली नाही असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

गणेशवाडीमध्ये पुरातन श्री गणेश मंदिर आहे. गणेशवाडीत एक गणपती मंदिर आणि दुसरा मलई चक्का प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या भेसळ लो फॅट चक्कांच्या विक्रीमुळे गणेशवाडीचे नाव खराब होत आहे. तर याचा फटका प्रामाणिक व्यावसायिकांना बसत आहे.

दरम्यान याबाबत जिल्हा अधिकारी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी तुषार शिंगाडे यांच्याशी चर्चा केल्यावर ते म्हणाले की, चक्का, श्रीखंड, आम्रखंड यामध्ये कोणी केमिकल पावडर वापरून भेसळ करीत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात कर्जमाफीचे ५ हजार ८६ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जखात्यावर वितरीत

Wild Vegetable Conservation: रानभाज्यांच्या बियाणे बँकेसाठी प्रयत्न करा : प्रसाद

Fake Agricultural Products: नामवंत कंपनीच्या नावाने बनावट पोषकविक्री रॅकेटचा पर्दाफाश

Agrowon Podcast: तुरीच्या दरात चढ-उतार, हळदीच्या भावात बदल, वांगी दरात घसरण, पालकचे भाव टिकून तर संत्री दरात वाढ

International Agriculture Workshop: युवा शेतकरी प्रताप मारोडे यांची आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड

SCROLL FOR NEXT