Fertilizer Shortage Agrowon
ताज्या बातम्या

Fertilizer Shortage : टंचाई करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करा

Kharif Season येत्या खरीप हंगामात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई करणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई करावी तसेच कृषी विक्रेत्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना आमदार अतुल बेनके यांनी कृषी विभागाला केली

Team Agrowon

Pune News : येत्या खरीप हंगामात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई करणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई करावी तसेच कृषी विक्रेत्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना आमदार अतुल बेनके यांनी कृषी विभागाला केली.

कृषी विभागाच्या वतीने तालुकास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक जुन्नर पंचायत समितीच्या सभागृहात बुधवारी (ता.१०) झाली. यावेळी आमदार बेनके बोलत होते.

या वेळी ते म्हणाले, जुन्नर तालुका शेतीप्रधान तालुका असल्याने कृषी निविष्ठांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो शेतकऱ्यांच्या बाबत उत्पादक कंपनी किंवा कृषी विक्रेत्यांकडून चुकीचे काम झाले तर संबंधितावर शासनाच्या वतीने कारवाई करण्यात येईल.

पंचायत समितीचे कृषी अधिकारी नीलेश बुधवंत यांनी कृषी विभागाचा आढावा सादर केला. कृषी विभागाकडील विविध योजना व खते व बियाण्याची उपलब्धता याबाबत तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांनी माहिती दिली.

शेतकऱ्यांना कृषी विक्रेत्याकडून त्रास होणार नाही, याची अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी तसेच शेती शाळा गावस्तरावर घेण्यात याव्या अशी सूचना चिंचोलीच्या सरपंचांनी केली.

माजी सभापती विशाल तांबे, माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, भाऊ देवाडे,बाजार समितीचे संचालक प्रकाश ताजने, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, जिल्हा कृषी अधिकारी संजय पिंगट, तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, बापूसाहेब रोकडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत शेटे, विविध गावचे सरपंच, कृषी सहायक, ग्रामसेवक, तालुक्यातील खते बियाणे औषधे विक्रेत्यांचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते. बापूसाहेब रोकडे यांनी प्रास्ताविक केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT