Linking Scheme
Linking Scheme Agrowon
ताज्या बातम्या

खत लिंकिंगची सक्ती करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी

Team Agrowon

युरिया खतासोबत (Urea Fertilizer) इतर खतांच्या खरेदी (लिंकिंग स्कीम) (Linking Scheme) सक्तीचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. अशी सक्ती करणाऱ्या वितरक आणि कंपन्यावर कारवाई करण्याची मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यासंबंधी त्यांनी राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांना पत्र दिले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना युरिया खताच्या खरेदी सोबत इतर खतं आणि किटकनाशक खरेदीची सक्ती दुकानदार आणि कंपन्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने युरियासोबत इतर खतं आणि कीटकनाशकांची खरेदी करावी लागते आहे. त्यामुळे या प्रकरणी कोणत्याही तक्रारीची वाट न पाहता कृषी आयुक्तांनी स्वतः चौकशी करावी अशी मागणी खासदार कोल्हे यांनी केली आहे.

राज्यातील शेतकरी खरीप हंगामाची तयारी करत आहेत. खरीप हंगामासाठी खत खरेदी करताना दुकानदार आणि कंपन्याकडून शेतकऱ्यांवर इतर खतं आणि किटकनाशक घेण्याची सक्ती करण्यात येत आहे. त्याचे वाहतूक भाडेही शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. दुकानदार मात्र कंपन्याकडून अशी सक्ती होत असल्याचे कारण देतात.

खरेदी सक्तीमुळे शेतकऱ्यांना गरज नसलेल्या खतांची खरेदी करावी लागते. या खत आणि कीटकनाशकांचा वापरही करता येत नाही. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दुकानदार आणि कंपन्याच्या या मनमानी कारभाराविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. परिणामी अशा प्रकारची सक्ती करणाऱ्या दुकानदार आणि कंपन्यावर कारवाई करण्याची मागणी खासदार कोल्हे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT