Nashik ZP Agrowon
ताज्या बातम्या

Nashik ZP : ‘लेट लतिफ’ कर्मचाऱ्यांवर जि.प.चा कारवाईचा बडगा

Zilla Parishad News : ग्रामीण विकासाचे केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा परिषदेत बुधवारी (ता. २६) विविध विभागांतील तब्बल ९५ कर्मचारी उशिरा दाखल झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

Team Agrowon

Nashik News : ग्रामीण विकासाचे केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा परिषदेत बुधवारी (ता. २६) विविध विभागांतील तब्बल ९५ कर्मचारी उशिरा दाखल झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने कर्मचाऱ्यांच्या येण्याची वेळ तपासून संबंधित विभाग प्रमुखांनाच कारवाई करण्याचे आदेश दिले.

जिल्हा परिषदेची कार्यालयीन वेळ ही सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ आहे; परंतु काही कर्मचारी सतत उशिरा येत असल्याबाबतच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे येत होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागास तपासणीचे निर्देश दिले होते.

त्यानुसार नेहमीप्रमाणे सकाळी ९.४५ वाजता सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी काही विभागांना भेटी देत पाहणी केली असता अनेक कर्मचारी कार्यालयीन वेळ सुरू झाली असूनसुद्धा कार्यालयात उपस्थित नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी सकाळी १०.२० मिनिटांनी जिल्हा परिषदेतील सर्व विभागांतील कर्मचारी हजेरी पत्रक मागवून घेत सामान्य प्रशासन विभागास तपासणीचे निर्देश दिले. या तपासणीत २० विभागांतील तब्बल ९५ कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्याचे आढळून आले.

ही सर्व हजेरी पत्रके परदेशी यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. ज्यामध्ये बांधकाम विभागाचे उशिराने येणारे सर्वाधिक कर्मचारी आढळून आले आहेत. मुख्यालयात ४३५ कर्मचारी असून, यापैकी तब्बल ९५ कर्मचारी कार्यालयीन वेळेत हजर नसल्याचे आढळून आले. त्यांना विभाग प्रमुखांमार्फत ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात येणार आहे. नोटिसांचा खुलासा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना करावा, अशा सूचना दिल्या आहेत.

विभागनिहाय अनुपस्थित कर्मचारी संख्या ः

अर्थ विभाग (५), कृषी (७), पशुसंवर्धन (३), समाजकल्याण (८), महिला व बालकल्याण (१), प्राथमिक शिक्षण (१२), माध्यमिक शिक्षण (४), आरोग्य (११), बांधकाम-१ (१३), बांधकाम - २(७), बांधकाम - ३(६), लघुपाटबंधारे (१), ग्रामीण पाणीपुरवठा (४), समग्र शिक्षा अभियान (३), पाणीपुरवठा व स्वच्छता (५), मनरेगा (२), राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान विभाग (३).

सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत येणे अपेक्षित असताना बहुतांश कर्मचारी उशिराने येतात. अशा कर्मचाऱ्यांवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.
- रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जि. प. नाशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India US Trade Deal : भारताची कृषी बाजारपेठ खुली करण्यासाठी काही मुद्द्यांवर सहमती; अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी ग्रीअर यांची समितीसमोर माहिती

MSP Procurement : केंद्र सरकारने हमीभाव खरेदीची जबाबदारी राज्यांवर टाकू नये; तेलंगणाच्या कृषिमंत्र्यांची मागणी

Post Harvest Management: पॅकहाउस उभारणीसह प्रक्रिया पद्धती बसविताना...

Fertilizer Shortage: केंद्राने खरीप हंगामापूर्वी खत टंचाईची शक्यता फेटाळली; युरियाचा साठा स्थिर

Chilli Business Story: मिरची विक्रीला दिले व्यावसायिक रूप

SCROLL FOR NEXT