Katraj Dairy Agrowon
ताज्या बातम्या

Katraj Dairy : पुतण्या थकबाकीदार, काकाचे दूध संघाचे संचालकपद रद्द

Cooperative Dairy : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज डेअरी) संचालक अरुण चांभारे यांचे संचालकपद सहकारी संस्थांच्या दूग्ध विभागाचे विभागीय उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी रद्द केले आहे.

Team Agrowon

Pune News : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज डेअरी) संचालक अरुण चांभारे यांचे संचालकपद सहकारी संस्थांच्या दूग्ध विभागाचे विभागीय उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी रद्द केले आहे. चांभारे यांचा पुतण्या जिल्हा दूध संघाचा थकबाकीदार असल्याचे कारण देण्यात आले आहे.

दरम्यान, याच विषयावर याआधी मुंबई उच्च न्यायालयाने पुतण्या हा कुटुंबाचा घटक नसल्याचे स्पष्ट करत, मला विजय घोषित केले होते. त्यामुळे विभागीय उपनिबंधकांचा हा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विसंगत आहे. शिवाय माझा न्यायालयावर विश्‍वास आहे. त्यामुळे या निर्णयाला मी उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे अरुण चांभारे यांनी सांगितले.

जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक ही मार्च २०२२ मध्ये झाली होती. या निवडणुकीत चांभारे हे खेड तालुका सर्वसाधारण मतदार संघातून संचालक म्हणून निवडून आले होते. या निवडणुकीत त्यांनी माजी संचालक चंद्रशेखर शेटे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.

या पदावरून चांभारे आणि शेटे या दोघांमध्ये २०१० पासून मोठी चुरस आहे. यातूनच २०१५ पासून हे दोघेही हे पद आपल्याकडेच कसे राहील, या उद्देशाने एकमेकांविरुद्ध न्यायालयीन लढाई लढत आहेत. यानुसार शेटे यांनी चांभारे यांच्या विरोधात सहकार न्यायालयात, तर शेटे यांचे कार्यकर्ते राजेंद्र म्हसे यांनी विभागीय उपनिबंधकांकडे तक्रार दाखल केली होती.

यापूर्वी २०१० मध्ये अरुण चांभारे हे जिल्हा दूध संघावर निवडून आले होते. त्या वेळी त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. त्यानंतर २०१५ मध्ये झालेल्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत पुतण्याच्या थकबाकीच्या कारणांवरूनच चांभारे यांचा उमेदवारी अर्ज अवैध करण्यात आला होता. त्यामुळे चांभारे हे त्यावेळी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर गेले होते.

तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला चांभारे यांनी पहिल्यांदा सहकार न्यायालय आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या वेळी पुतण्या हा चांभारे यांच्या कुटुंबाचा घटक होत नसल्याचा निर्वाळा सहकार न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर चांभारे यांनी पुन्‍हा मार्च २०२२ च्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर शेटे यांनी हरकत घेत, तो अवैध ठरविण्याची मागणी केली होती. परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळून लावली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT