Nashik DCC Bank Agrowon
ताज्या बातम्या

Nashik DCC Bank : दहा लाखांवर कर्ज थकलेल्या थकबाकीदारांवर कारवाई

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५५ हजार कर्ज बुडव्यांमुळे बँकेचे ११ लाख ठेवीदार अडचणीत सापडले आहेत. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गत आठवड्यात थकित कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये, असे निर्देश दिले.

Team Agrowon

Nashik DCC Bank जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५५ हजार कर्ज बुडव्यांमुळे बँकेचे ११ लाख ठेवीदार अडचणीत सापडले आहेत. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गत आठवड्यात थकित कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये, असे निर्देश दिले.

यावर बँकेच्या ठेवीदार, सभासद आणि कर्मचारी वर्गात संतप्त भावना व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे, जिल्हा बँकेने मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली आहे. अशा ६७ बड्या थकबाकीदारांची यादीच प्रसिद्ध केली.

जिल्हा बँकेचा २०२३-२४ कर्ज वसुली हंगाम सुरू असून बँकेच्या जिल्ह्यातील ५५ हजार ७३७ थकबाकीदार सभासदांनी २ हजार ३६५ कोटींचे (मुद्दल+व्याज) कर्ज थकविल्यामुळे बँक आर्थिक अडचणीत सापडली आहे.

यंदाच्या वसुली हंगामात जास्तीत जास्त थकीत कर्ज वसुली होण्याकामी व बँकेच्या खातेदारांना ठेवींची/खात्यावरील त्यांची बचतीची रक्कम उपलब्ध होण्यासाठी बँकेने वसुलीबाबत आढावा बैठक झाली.

जिल्ह्यातील मोठे व प्रभावशाली थकबाकीदारांवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १९६१ चे नियम १०१ नुसार कारवाई करून अशा थकबाकीदारांवर थकबाकीची कर्ज वसुलीसाठी कारवाई सुरू केली आहे.

त्यानुसार बँकेने जिल्ह्यातील व तालुक्यातील मोठ्या व प्रभावशाली तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणाऱ्या, वारंवार कर्ज मागणी नोटिसा देऊनही व सौजन्याने तगादे करूनही थकीत रकमेचा भरणा केला नसलेल्यांच्या याद्या तयार करून १० लाखांवरील थकबाकीदार सभासदांची टप्प्याटप्प्याने लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT