Kharif Season Agrowon
ताज्या बातम्या

Intercultural Operation : खरीप पिकांतील अंतर्गत मशागतीच्या कामाला वेग

Kharif Season 2023 : पुनर्वसू नक्षत्र संपल्याने पावसाची संततधारही संपली. आता उघडीप दिल्याने शेत शिवारात अंतर्गत मशागतीचे काम वेगात सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.

Mahesh Gaikwad

अविनाश काळे

Dharashiv News : पुनर्वसू नक्षत्र संपल्याने पावसाची संततधारही संपली. आता उघडीप दिल्याने शेत शिवारात अंतर्गत मशागतीचे काम वेगात सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान यंदा खरिप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे पेरण्याच्या कालावधी वाढला. शेवटच्या पाच टक्क्यातील पेरण्याचे काम सुरू आहे.

निसर्गाची वेळेवर साथ मिळाली तरच कोरडवाहु क्षेत्रातील पिक जोमाने येते. यंदा मृग नक्षत्रात पाऊस झाला नाही. आर्द्रा नक्षत्रही फारसे समाधानकारक नव्हते. कांही भागात झालेल्या पावसाने पेरणीला आधार मिळाला होता.

परंतु पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीची भिती असतानाच भितीने शेतकरी हवालदिल झाला पुनर्वसू नक्षत्राच्या संततधार पावसाने पिकांना दिलासा दिला. दरम्यान कांही मोजक्या क्षेत्रात शिल्लक क्षेत्रात पेरणीचे काम सुरू असल्याचे चित्र दिसून आले.

तणनाशक, किटकनाशक फवारणीच्या कामाला वेग

सतंतधार पावसामुळे पंधरा दिवस पिकात तण वाढले. पण रानात पाऊल ठेवणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांना पिकाच्या सुरक्षिततेची कामे शक्य झाले नाहीत. गेल्या पाच, सहा दिवसापासुन बैलजोडीच्या मदतीने पिकातील अंतर्गत मशागतीचे काम केली जात आहेत,

शिवाय कमी वेळेत अधिक क्षेत्रात वाढलेले तण नाहीसे करण्यासाठी मिनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने तणनाशक औषध फवारणीचे काम सुरू आहे. दरम्यान कांही क्षेत्रात आगोटी पेरण्या झाल्याने सोयाबीन क्षेत्रात रोगराईच्या शक्यतेने किटकनाशकाचीही फवारणी केली जात आहे.

यंदा पेरण्याचे गणित चुकले आहे ; तरीही बऱ्याच क्षेत्रात सोयाबीनचे पिक बहरात आले आहे. मध्यंतरी झालेल्या पावसाने शेतात तण वाढले आहे, कांही क्षेत्रात किटकांचा प्रार्दुभाव दिसतो आहे. मिनी ट्रॅक्टरवर एका व्यक्तीच्या मदतीने एका दिवसात पंधरा एकर पेक्षा अधिक क्षेत्रात औषध फवारणीचे काम होत आहे. मजुराची वाणवा असल्याने हा पर्याय महत्वाचा ठरतो आहे.
राम शिंदे , शेतकरी उमरगा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT