Dairy  Agrowon
ताज्या बातम्या

Dairy : ‘आरे’चे दूध वितरण, संकलन बंद

वर्धा येथील डेअरीचे बॉयलर चार जूनला जळाले होते. मात्र दहा ते बारा दिवस अधिकाऱ्यांनी लक्षच दिले नाही. त्यामुळे दूध वितरण व संकलनही आपसूकच बंद झाले.

टीम ॲग्रोवन

नागपूर ः जळालेले बॉयलर (Milk Boiler) दुरुस्तीसाठी अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने आरे शासकीय दूध डेअरीचे दूध संकलन व वितरण (Aarey Milk Collection And Distribution) जून महिन्यांपासून बंद झाले आहे. शिवसेनेच्या वतीने अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

वर्धा येथील डेअरीचे बॉयलर चार जूनला जळाले होते. मात्र दहा ते बारा दिवस अधिकाऱ्यांनी लक्षच दिले नाही. त्यामुळे दूध वितरण व संकलनही आपसूकच बंद झाले. त्यानंतर माजी दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन याबाबत माहिती देण्यात आली. केदार यांच्या पत्रानंतर हालचाली सुरू झाल्या.

२८ जूनला बॉयलर दुरुस्त करण्यात आले. यात तब्बल २३ दिवस अधिकाऱ्यांनी घालविले. त्यामुळे शेतकरी व दूध संघांनी खासगी डेअरीला दुधाची विक्री करणे सुरू केले. आता आरेला दूध द्यायला कोणी तयार नाही. बॉयलर जळाल्याने वर्धा डेअरीला मिळणारे दूध चंद्रपूर डेअरीला देणे आवश्यक होते. तेसुद्धा देण्यात आले नाही. त्यामुळे चंद्रपूरची डेअरीसुद्धा बंद पडली.

‘कामचुकार पगारी अधिकाऱ्यांमुळे शासकीय दूध डेअरीला दूध मिळत नाही. अशा अधिकाऱ्यांवर राज्य सरकारने कारवाई करावी आणि याचा जाब विचारावा,’’ अशी मागणी शिवसेनेच्या वतीने विधानसभा संघटक राजेश कनोजिया यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT