Aquarium Agrowon
ताज्या बातम्या

Aquarium : मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारणार

मुंबईत जागतिक दर्जाचे नवीन मत्स्यसंकुल आणि अत्याधुनिक मत्स्यालय उभारण्यात येईल, असे बुधवारी (ता. २३) मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

टीम ॲग्रोवन

मुंबई : मुंबईत जागतिक दर्जाचे नवीन मत्स्यसंकुल (Fish Complex) आणि अत्याधुनिक मत्स्यालय (Aquarium)उभारण्यात येईल, असे बुधवारी (ता. २३) मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले. मंत्रालयात तारापोरवाला मत्स्यालयासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी यासंदर्भातील निर्देश विभागाला दिले.

हे नवीन जागतिक दर्जाचे मत्स्यालय सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर विकसित करण्याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करावा. हे मत्स्यालय जगातील सर्वोत्तम मत्स्यालयापैकी एक गणले जावे, याचे नियोजन करावे, असेही निर्देश मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले.

मुंबईची ओळख असलेले तारापोरवाला मत्स्यालय गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांसाठी बंद आहे. तारापोरवाला मत्स्यालयाची इमारत जवळपास ७५ वर्षे जुनी आहे. तर, बाजूची इमारतही ५० वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे.

मत्स्यालयाच्या परिसरात सुरू असलेल्या कोस्टल रोडच्या कामामुळे मत्स्यालयाच्या इमारतींना धक्का पोहोचला असून त्या धोकादायक असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे या इमारती लवकरात लवकर निर्लेखित करण्याचे निर्देशही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले.

सध्या तारापोरवाला मत्स्यालयात १६ सागरी पाण्याच्या टाक्यांमध्ये ३१ प्रकारचे मासे आहेत. तर, गोड्या पाण्यातील आणि ३२ ट्रॉपिकल टाक्यांमध्ये ५४ प्रकारचे मासे आहेत. तारापोरवाला मत्स्यालयाबाबतच्या या आढावा बैठकीस मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव पराग जैन नानोटिया, मत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT