Milk Rate  Agrowon
ताज्या बातम्या

Milk Rate : गाईच्या दूधदरात एक ते दोन रुपयांची कपात ; खासगी दूध संघांचा निर्णय

Cow Milk : खासगी दूध संघ असोसिएशनच्या बैठकीत गाईच्या दूधदरात प्रतिलिटरला एक ते दोन रुपये कपात केली जाणार आहे.

Team Agrowon

Sangli News : खासगी दूध संघ असोसिएशनच्या बैठकीत गाईच्या दूधदरात प्रतिलिटरला एक ते दोन रुपये कपात केली जाणार आहे. येत्या दोन दिवसांत प्रतिलिटरला किती रुपयांची कपात होईल, हे निश्चित होईल. म्हशीच्या दूधदरात वाढ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ ऑक्टोबर २०२३ पासून केली जाणार आहे.

खासगी दूध संघाच्या बैठकीस चितळे डेअरीचे श्रीपाद चितळे, थोटे डेअरीचे शीतल थोटे, भारती डेअरीचे किरीट मेहता, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजी पाटील, विनायकराव पाटील, तसेच विराज दूध डेअरी (विटा), रामविश्वास दूध डेअरी (सांगली), विटा डेअरी (मिरज) यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. म्हशीचा दूध दर प्रतिलिटर साडेसहा स्निग्धांशाला दीड रुपयांनी वाढविला आहे. गायीच्या दूधदरात एक ते दोन रुपये प्रतिलिटर कपात केली आहे. हे दूध सरसकट ३३ रुपयांनी खरेदी करण्यात येणार आहे. राज्य सरकारने म्हशीच्या दूधदरात प्रति लिटर दोन रुपये वाढ करण्याचा नुकताच निर्णय घेतला. त्यापासून खासगी दूध संघानेही दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगली जिल्ह्यात रोज सुमारे १३ लाख ५० हजार लिटर दूध संकलन होते. यात म्हशीच्या दुधाचे २५ ते ३० टक्के, तर गायीच्या दुधाचा ७० ते ७५ टक्के समावेश आहे.

गाईच्या दूधदरात प्रतिलिटरला एक ते दोन रुपयांची कपात करायची आहे. परंतु किती पॉइंटला दूध दर कमी होतील, हे आत्ताच सांगता येणार नाही. येत्या दोन दिवसांत त्यासंदर्भात दरपत्रक येईल, त्यानंतर स्पष्ट होईल.
- नेताजी पाटील, अध्यक्ष, राजारामबापू दूध संघ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT