Agricultural University Agrowon
ताज्या बातम्या

Agricultural University : कृषी तंत्र विद्यालयात पालक-शिक्षक मेळावा संपन्न

येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी तंत्र विद्यालयात शुक्रवार (ता.१८) रोजी पालक-शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला.

Team Agrowon

कसबे-डिग्रज (जि. सांगली) ः येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ,(Mahatma Phule Agricultural University) राहुरी अंतर्गत कृषी तंत्र विद्यालयात शुक्रवार (ता.१८) रोजी पालक-शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज माळी होते. या मेळाव्यास पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

यावेळी उपस्थित पालकांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. डॉ. माळी यांनी उपस्थित पालकांना अभ्यासक्रमाबाबत आणि विद्यालयातील रोपवाटिका, बिजोत्पादन, गांडूळखत, दुग्ध व्यवसाय या पूरक व्यवसायातील संधीबाबत मार्गदर्शन केले.

डॉ. प्रदीप पाटील यांनी गतवर्षात राबविलेल्या उपक्रमांच्या माहितीचे सादरीकरण तर शर्मिला वाटकर यांनी वसतीगृह नियमावली विशद केली. कार्यक्रमाचे आभार नितीन घोरपडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिगंबर आकिवाटे, महेश केवले, राजू कापसे, गजानन डाखोरे, अमुक्षिध, मंगल पाटील यांनी परिश्रम घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT