Crop Insurance  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : नुकसानग्रस्तांना अग्रिम देण्याबाबत अधिसूचना काढणार

Kharif Season : जिल्ह्यात या हंगामात कमी पावसामुळे खरीप पिकांची स्थिती बिकट बनली आहे. पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांवर घटण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Akola News : जिल्ह्यात या हंगामात कमी पावसामुळे खरीप पिकांची स्थिती बिकट बनली आहे. पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांवर घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने पीकविमा योजनेतून नुकसान भरपाई दिली जावी, अशी मागणी जिल्हाभरातून होत असल्याने प्रशासनाने आता पंतप्रधान पीकविमा योजनेतून नुकसानग्रस्तांना २५ टक्के अग्रिम देण्याबाबतची अधिसूचना काढणार असल्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी (ता.६) सायंकाळच्या सुमारास झालेल्या जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

बैठकीला जिल्हाधिकारी अजित कुंभार हे ऑनलाईन, तर प्रभारी जिल्हाधिकारी वैष्णवी बी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, कृषी उपसंचालक विलास वाशिमकर, विमा कंपनी प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यात ५२ महसूल मंडलांत पीकविमा योजनेत सहभागी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईच्या २५ टक्के अग्रिम देण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अधिसूचना काढण्यात यावी, असे बैठकीत ठरले. यंदा सोयाबीनची २ लाख १५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. पाऊस न झाल्याने या पिकाचे उत्पादन घटण्यावर शिक्कामोर्तब झालेले आहे.

मागील वर्षातील अग्रिम अधिसूचना प्रलंबितच

गेल्या वर्षात तत्कालीन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी पीक विमा योजनेतून २५ टक्के अग्रिम देण्याबाबत अधिसूचना काढली होती. मात्र, विमा कंपनीने तेव्हा आक्षेप घेत हे प्रकरण ताटकळत ठेवले.

ही संपूर्ण प्रक्रिया उशिरा झाल्याने कंपनीला फावले होते. शिवाय उत्पादन निकषही न बसल्याने कंपनीला संधी मिळाली. यात प्रशासनाकडून तेव्हा योग्य पद्धतीने हे प्रकरण हाताळण्यात आले नसल्याचा आरोप शेतकरी वारंवार करीत आहेत. या वर्षात तरी अग्रिम रक्कम मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT