Humani Pest  Agrowon
ताज्या बातम्या

Humani Pest Control : हुमणी कीड नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे

Humani Pest : ‘आत्मा’चे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर यांचे मत

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pest Control : पुणे : येत्या एक ते दोन महिन्यांत हुमणीचा मोठा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आताच हुमणीची कीड शेतातून हद्दपार करायची असेल तर सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत ‘आत्मा’चे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर यांनी व्यक्त केले.
कृषी विभागाचा आत्मा विभाग व द फार्म एज्युकॉन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती व हुमणी कीडनियंत्रण याबाबत भांडगाव येथे नुकतेच चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

या चर्चासत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. रूपनवर यांनी ही माहिती दिली. या वेळी टेस्टी बाइटचे कार्यकारी संचालक राज जाधव, फॉर्म मॅनेजर दत्तात्रय बारवकर, भांडगावचे माजी उपसरपंच रवींद्र दोरगे, कृषी सहायक महेश पाटील, कृषी विक्रेते कैलास दोरगे, टेस्टी बाइटचे प्रतिनिधी डॉ. अमोग वांगी, गोरख धायगुडे आदी उपस्थित होते.

श्री. रूपनवर म्हणाले, की हुमणीच्या विविध अवस्था आहेत. पाऊस झाल्यानंतर त्यांची उत्पत्ती झाल्यानंतर भौतिक, जैविक व रासायनिक नियंत्रण केले तरीही काही प्रमाणात पिकांचे नुकसान होते. परंतु हुमणी कीड नियंत्रणासाठी प्रकाश सापळे जर सर्व शेतकऱ्यांनी वेळेवर लावले तर हुमणीची जमिनीवरची अवस्था ज्याला आपण भुंगेरी असे म्हणतो हे गोळा करणे सोपे जाते. त्यानंतर बाकीच्या अवस्था म्हणजेच अळी, अंडी, कोश या तीनही अवस्था जमिनीच्या खाली असल्याने नियंत्रण मिळवणे जिकरीचे होऊन बसते. त्यासाठी आताच प्रकाश सापळे लावून हुमणीचे नियंत्रण करणे गरजेचे आहे.कार्यक्रमात दत्तात्रय बारवकर यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT