Wheat Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Bogus Seed : भेसळयुक्त गहू बियाणे विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल

भेसळयुक्त गहू बियाणे विक्री प्रकरणी पितापुत्रांविरुद्ध गुरुवारी (ता.१७) जुन्नर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.

टीम ॲग्रोवन

जुन्नर, जि. पुणे ः भेसळयुक्त गहू बियाणे (Bogus seed) विक्री प्रकरणी पितापुत्रांविरुद्ध गुरुवारी (ता.१७) जुन्नर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.

येणेरे (ता.जुन्नर) येथील शेतकरी सुशांत ढोले यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तसेच कृषी विभागाने पांडव शेती भांडारचे शेखर पांडव व आशिष शेखर पांडव दोघेही (रा. जुन्नर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ढोले व त्यांचे मित्र बाबूराव घोगरे गुरुवारी बी-बियाणे व खत घेण्यासाठी पांडव शेती भांडारमध्ये गेले होते. शेखर पांडव यांच्याकडे त्यांनी ‘अंकुर केदार’ या जातीचे गहू बियाणे मागितले. या वेळी त्यांनी गव्हाचे पंधरा किलो बियाणे दुसऱ्या कोणत्या तरी जातीच्या गव्हाच्या पिशवीमध्ये दिले.

त्यामुळे शंका आल्याने ढोले यांनी येथील नजीकच्या दुसऱ्या दुकानात जाऊन ‘अंकुर केदार’ जातीच्या गव्हाच्या बियाण्याबाबत खात्री केली. त्यावेळी त्यांना घेतलेल्या गहू बियाण्यात भेसळ असल्याचे समजले. या बाबत पांडव यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या बाबत पोलिस उपनिरीक्षक पवार पुढील तपास करीत आहेत.

बियाण्यांसह खतसाठा सील

तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाट, खते व औषधे गुण नियंत्रण अधिकारी नीलेश बुधवंत यांनी पांडव शेती भांडार दुकानातील बी. बियाणे, खतांची तपासणी केली. या वेळी त्यांना पांडव यांनी परवान्यापेक्षा अधिक गोदामे केली असल्याचे दिसून आले.

यात गहू व अन्य बियाण्यांचा ४ हजार ८०० किलो तसेच ९५ मेट्रिक टन खतांचा साठा आढळून आला. त्यांचे दुकान व गोदाम सील करण्यात आले आहे. या बाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविला आहे, असे बुधवंत यांनी सांगितले. शेतकरी संघटनेचे अंबादास हांडे, प्रमोद खांडगे पाटील, संजय भुजबळ,अजित नाना वालझडे यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT