Bribe Agrowon
ताज्या बातम्या

Bribe News : लाचखोर ग्रामसेवकास रंगेहाथ अटक

नितीन सगाजी मेहेरखांब (४२, रा. त्रिमूर्ती चौक, संगमनेर, जि. अहमदनगर) असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे.

Team Agrowon

Nashik News : गावठाणमधील इमारतीची नोंद करून व इमारतीची ग्रामपंचायतीप्रमाणे घरपट्टी ठरवून देण्याचे मोबदतल्यात पन्नास हजारांच्या लाचेची मागणी करून २५ हजारांची लाच स्वीकारताना पात्रे येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.

नितीन सगाजी मेहेरखांब (४२, रा. त्रिमूर्ती चौक, संगमनेर, जि. अहमदनगर) असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार त्यांचे पाथरे खुर्द (ता. सिन्नर) येथे गावठाण हद्दीत जुने घर असून त्यांनी घराचा काही भाग व ओटा तोडून दोन मजली इमारत बांधली.

गावठाणमधील इमारतीची नोंद करून व इमारतीची ग्रामपंचायतीप्रमाणे घरपट्टी ठरवून देण्याच्या मोबदल्यात लाचखोर ग्रामसेवक मेहेरखांब याने तक्रारदारांकडे बुधवारी (ता. १२) पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता पथकाने शहानिशा केल्यानंतर सापळा रचला.

बुधवारी (ता. १२) रात्री लाचेचा पहिला हप्ता २५ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील एका हॉटेलमध्ये संशयित लाचखोर मेहेरखांब याने तक्रारदारांकडून २५ हजारांची लाच स्वीकारली. त्या वेळी दबा धरून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मेहेरखाम यास रंगेहात अटक केली.

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक साधना इंगळे, सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी, परशुराम जाधव यांनी ही कारवाई केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT